आपल्या परिसंस्थेत प्रत्येक जलचर काही विशिष्ट भूमिका बजावतो. जलचरांमुळे पोषणद्रव्यांचे पुनर्चक्रीकरण होते, पाणी शुद्ध होते, पाण्यातील अन्नसाखळी आणि अन्नजाळे कार्यरत राहते. त्यांच्या अस्तित्वामुळे आपल्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात, जसे शून्य भूकबळी, दारिद्रय़निर्मूलन, इत्यादी. परंतु मानवाच्या आधुनिक जीवनशैलीमुळे हे सारे संकटात येतात. जलचर म्हटले की आपल्याला केवळ मासे आठवतात, परंतु प्रत्यक्षात निरनिराळय़ा प्रकारचे अनेक प्राणीमात्र नद्या, तलाव, सरोवर, अशा गोडय़ा पाण्यात आणि त्याहून खूप जास्त प्रजाती सागराच्या जास्त क्षारतेच्या आणि खाडीच्या निमखाऱ्या पाण्यात राहतात. सागरी सस्तन, सरीसृप, पाणथळ जागेतले पक्षी, तसेच सागरी परिसंस्थेवर अवलंबून असणारे पक्षी, इत्यादी पृष्ठवंशीय आणि इतर अगणित अपृष्ठवंशीय जसे, रंध्री, आंतरगुही, वलयी, संधिपाद, मृदुकाय, कंटकीचर्मी, काही प्रकारचे कीटक अशा बहुतेक सर्वच प्राणीसंघांचे सभासद पाण्यात सुखेनैव संचार करतात. पण माणसाने त्यांना सळो की पळो केले आहे. जगण्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षितता नष्ट करण्याचा चंग बांधला आहे. पाण्यात भराव घालणे, कांदळवने नष्ट करणे, प्रदूषके सोडणे, गटाराचे पाणी सोडणे, अणूचाचण्या करणे, कसेही आणि कितीही प्लास्टिक पाण्यात टाकून देणे, अशा अनेक प्रकारचे धोके मानव या जलचरांना सतत देत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याशिवाय अन्न म्हणून मारले जाणारे मासे सोडल्यास इतर जलचरदेखील विविध कारणांसाठी वापरले जातात. उदाहरणार्थ, शंख-शिंपल्यांचा वापर बांधकामात तर काही जलचरांचा वापर औषधनिर्मितीसाठी होतो. हे सर्व नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जलचर कायदा (अॅक्वेटिक अॅनिमल लॉ इनिशिएटिव्ह) करण्यासाठी अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील पोर्टलंड येथील ‘लेविस आणि क्लार्क लॉ स्कूल’ या संस्थेने २०१६ मध्ये पुढाकार घेतला. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून २०२० मध्ये प्रथमच ‘३ एप्रिल’ रोजी ‘जागतिक जलचर दिन’ साजरा करून सर्व सामान्यांना या जिवांच्या रक्षणात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न झाला. प्राणीविषयक कायदे करणाऱ्या संस्थेचा हा प्रयत्न होता. तिथे शिकणाऱ्या विद्यार्थानी जागतिक पातळीवर जलचरांविषयी संवेदनशीलता वाढवावी, यासाठी ही योजना करण्यात आली. शिक्षणाच्या माध्यमातून, कायदे करून, धोरणे राबवून, शास्त्रोक्त पद्धतीने परिसंस्था जतन करण्याचा संदेश विविध कार्यक्रमांद्वारे दिला जातो.