पांडवांचे जळालेले लाक्षागृह पुराणात प्रसिद्ध होते. तीच लाख महत्त्वाच्या टपालावरही आपण पाहतो. ही लाख नक्की काय असते? लाखेचा किडा हा भारत आणि थायलंडमधील निरनिराळ्या ४०० प्रकारच्या जंगली वृक्षांवर आढळतो. पळस, कुसुम आणि बोराच्या झाडांवर यांचे वास्तव्य अधिक असते. लॅसीफर लॅक्का (Laccifer lacca) किंवा केरींया लॅक्का (Kerria lacca) या कीटकाची मादी लाखेची, तसेच मेणाची निर्मिती करते, हाच तो भारतीय लाखेचा किडा! यांच्या जीवनचक्रात पहिली अवस्था ‘क्रॉलर्स’ किंवा अळीची असते. या अळ्या यजमान झाडाच्या फांद्याच्या अंत:परिकाष्ठ (phloem) भागात शिरून पोषण मिळवतात. या शिरकावाच्या वेळी पडणाऱ्या छिद्रांना बुजवण्यासाठी त्यांच्या शरीर उत्सर्जनातून लाख निर्माण होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा