जमिनीचा पोत म्हणजे जमिनीतील वाळू (जाड व बारीक), गाळ (पोयटा) व चिकणमाती यांचे परस्परांशी असणारे प्रमाण. जमिनीत या चारही प्रकारच्या मातीचे कण कमी-अधिक प्रमाणात असतात. त्यांच्या प्रमाणावरून जमिनीचा पोत ठरवितात. मातीच्या कणांचे प्रमाण किती आहे, हे पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त पिपेटबीकर पद्धतीचा उपयोग करतात.
जमिनीतील पाण्याची चलनवलन क्षमता जमिनीच्या पोतावर अवलंबून असते. मातीचे कण जितके सूक्ष्म तितके अधिक पाणी सूक्ष्म कणांतील पोकळीत साठून राहते. भारी पोताच्या जमिनीत बारीक कणांचे प्रमाण, खनिज द्रव्यांचा साठा आणि जमिनीची जलधारणा शक्तीदेखील अधिक असते. म्हणून पिकांच्या दृष्टीने भारी जमिनी सुपीक असतात. केशाकर्षणामुळे या जमिनीतील पाणी बऱ्याच काळापर्यंत पिकाच्या मुळांना मिळू शकते. हलक्या पोताच्या अथवा वाळूसर जमिनीत पाणी फार वेळ राहत नाही. त्यामुळे पिकास दिलेले खत निचऱ्यावाटे बाहेर पडण्याची शक्यता अधिक असते.
जमिनीची प्रतवारी त्या जमिनी कोणत्या खडकापासून तयार झाल्या आहेत, त्या विभागातील हवामान यांवर अवलंबून असते. उथळ जमिनी, मध्यम खोल जमिनी आणि खोल जमिनी अशी जमिनीची प्रतवारी करतात.
उथळ जमिनी उंच शिखरे व डोंगराळ रांगांवर आढळतात. पिकासाठी या आíथकदृष्टय़ा परवडत नाहीत. या जमिनीमध्ये काही ठिकाणी गंधक, लोह, जस्त आणि बोरॉन या अन्नघटकांची कमतरता आढळते. या जमिनीत वने व कुरणे यांची लागवड फायदेशीर ठरते.
मध्यम खोल जमिनी मेजाकृती पठारावर आढळतात. या मध्यम पोताच्या असून यात नत्र, स्फुरद, लोह, जस्त आणि गंधकाची कमतरता असते. पावसाची अनुकूलता असेल, तर या जमिनीत दुबार पिके घेता येतात.
खोल जमिनी सुपीक असून प्रामुख्याने मदानी विभागात आढळतात. स्मेकटाइट प्रकारची माती विपुल असल्यामुळे या जमिनीची जलधारणाशक्ती जास्त असते. या जमिनीत सेंद्रीय कर्बाचे आणि नत्राचे प्रमाण अतिशय कमी असते. उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण कमी ते मध्यम असून उपलब्ध पालाश जास्त असते. लोह आणि जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते.

जे देखे रवी.. – पालथ्या घडय़ावर पाणी
हल्ली मी मारुतीला जातो. याचे कारण ज्यांची साडेसाती चालू आहे त्यांनी मारुतीची उपासना करावी असे सर्वत्र छापून येते. माझी रास वृश्चिक ती मंगळाची रास त्याचा शनी शत्रू असतो. म्हणून यांच्या भांडणात वृश्चिक लोकांचा बकरा होतो. माझी ही तिसरी साडेसाती. पहिल्या दोनमधले मिळालेले फटके लक्षात आहेत. पहिल्या वेळी मी अज्ञानी होतो. दुसऱ्या वेळी मी गर्विष्ठ असणार. हल्ली मात्र वयोमानापरत्वे शरीराने नव्हे तर मनाने वाकलो आहे किंवा लवचिक झालो आहे. पहिल्यांदा मारुतीचे देऊळ शोधण्याची गरज होती. बायकोला विचारण्याची सोय नव्हती. मी ज्ञानेश्वरी वाचतो म्हणून माझ्या खोलीला ही मठी म्हणते. आता देवाबद्दल विचारले तर संशयाचे वादळच निर्माण होणार आणि देव कुठला तर मारुती. म्हणून मग मी आमच्याकडे स्वयंपाक करायला एक मुलगी येते तिला विचारले तेव्हा एक खूप मोठा लांब हात करून हे काय इथेच जवळ आहे असे तिने मला दाखवले. घरापासून पाचशे यार्डवर देऊळ आहे ते मला माहीतच नव्हते. देऊळ छोटेसे आहे. बाहेर एक खोली आहे तिथे बरेच वेळा एक सायकल असते आणि जवळच एक कुत्रा लेटलेला असतो. हा कुत्रा कोणाचा असा प्रश्न मी तिथे नेहमी बसलेल्या बाईना विचारत नाही. हा मारुती स्वयंभू आहे आणि हा भाग गजबजला नव्हता तेव्हापासूनचा आहे. प्रदक्षिणेला जागा कमी आहे. मोठमोठे पुरुष जेव्हा हात हलवत आणि अधूनमधून भिंतीला हात लावत प्रदक्षिणा घालतात तेव्हा बायकांना अंग चोरावे लागते. काही काही वेळा बाहेरच्या खोलीत प्रार्थनेचा गजर करणारी मंडळी असतात. त्यांच्या आवाजातले मार्दव मोठे लक्षणीय असते. इथली घंटा बडवली जाते तो आवाज कर्कश वाटतो. ही घंटा बदला असे म्हणण्याची माझी छाती नाही. तिथे एक दिवस एक ज्येष्ठ नागरिक दिसले. गाभाऱ्यात शिरले होते. हातात पूर्ण अन्न वाढलेले एक ताट होते. एक घास हातात घेतला होता. आणि मारुतीला घास घे असे विनवत होते. हे बराच वेळ चालले हे बघण्यासाठी सात-आठ भाविक जमा झाले होते. मग थोडय़ा वेळाने ते थांबले. एकाने विचारले, ‘‘घेतला का घास?’’ तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, ‘‘मग घेतलाच त्याने, गेली चाळीस वर्षे भरवतो आहे.’’ मग या ज्येष्ठाने ताट उचलले आणि ते चालू पडले. जवळच राहात होते. मी त्यांच्या घरात घुसलो आणि म्हटले, ‘‘मारुतीचे राहू द्या, मी तुमच्याच पाया पडायला हवे.’’ म्हातारबुवा हसले आणि म्हणाले, ‘‘मी तुम्हाला ओळखतो. हल्लीच यायला लागलात वाटते. अहो तुम्ही जाऊन जाऊन जाणार कुठे?’’
– रविन मायदेव थत्ते  – rlthatte@gmail.com

vasai naigaon marathi news
वसई : दहा वर्षांपासून नायगाव खाडी पुलाचे काम अपूर्णच, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कामकाज ठप्प
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
vasai virar palghar forest declined
शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
vasai palghar forest area
वसई, पालघरचे वनक्षेत्र ३५ टक्क्यांनी घटले, भूमाफियांकडून जंगलतोड
policy will be prepared to resolve issues related to biodiversity parks says madhuri misal
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे ‘बीडीपी’बाबत मोठे वक्तव्य, म्हणाल्या…
Aatkoli dumping ground Thane corporation FIR registered
ठाणे पालिकेच्या आतकोली कचराभुमीवर दगडांसह पाण्याची चोरी, पालिका प्रशासनाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

वॉर अँड पीस – कृशता
केवळ त्वचाविकार असे फारच थोडे आहेत. बरेचसे त्वचेचे वाटणारे विकार हे यकृत, रक्त, मांस, मेद, कफ, पित्त यांच्या दृष्टीमुळे, पोटातील अन्नवहस्रोतस व रसरक्ताभिसरणाची यंत्रणा बिघडल्याची वॉर्निग असते. या लेखात आपण इसब, गजकर्ण, खरूज व नायटा; काळे पांढरे डाग, मुरूम, तारुण्यपीटिका; रूक्ष, तेलकट त्वचा यांचाच विचार करत आहोत. इतर त्वचासंबंधित विकारांचा अ‍ॅलर्जी, आग होणे, कंड, कुरूप, केसांचे विकार, कोड, गरमी, परमा, गोवर, कांजिण्या, गांधी उठणे, जखमा, जळवात, नागीण, महारोग, सोरायसिस यांचा अन्य लेखांत विचार होईल.
त्वचाविकाराकरिता ऊठसूट स्किन स्पेशालिस्टकडे पळण्यापेक्षा ‘कॉमनसेन्स’, प्राथमिक आरोग्य, पथ्यापथ्य व गरज असली तरच नेमकी व थोडी औषधे यांचा नीट वापर करावा. म्हणजे अधिक अपाय होत नाही. त्वचाविकाराकरिता बडेबडे स्किन स्पेशालिस्ट स्ट्राँग औषधे देतात. कल्पनेत नसलेले सांध्यांचे, हाडांचे किंवा इतर मोठे रोग उत्पन्न होतात. काटय़ाचा नायटा होतो. औषधांची रिअ‍ॅक्शन येते.
वैद्यक व्यवसायास सुरुवात करताना तरुण मुलामुलींच्या तारुण्यपीटिका, मुरूम किंवा त्यांच्या त्वचेच्या विकारांचे आपण स्पेशालिस्ट होऊ असे अजिबात वाटले नाही. हरि परशुराम औषधालयाच्या दुकानाच्या कामात असताना नित्य येणाऱ्या तरुण मुलामुलींच्या चेहऱ्याच्या तक्रारींकरिता नवनवीन प्रयोग एकमेकांच्या सहकार्याने आम्ही केले. त्यातून ‘सुवर्णमुखी’ व ‘हेमांगी’ ही दोन प्रभावी सौंदर्यप्रसाधने जन्माला आली.  त्वचेच्या या किरकोळ तक्रारींकरिता तरुण मुले-मुली काय हैराण असतात हे लक्षात घेता विचारी मन आतून किंचित खंत करते. पण शेवटी समोर आलेल्या ‘रोग्याचे’ दु:ख निवारण करणे हा वैद्याचा प्रधान धर्म आहे. चेहऱ्याबरोबरच आपली इंद्रिये, आत्मा, मन यांना प्रसन्न ठेवण्याची गरज त्वचाविकारांत जास्त असते. ‘दिव्याने दिवा लावावा’ असे आयुर्वेदीय उपचारांचे यश आहे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – २ मार्च
१९१७ > ताजमहाल हे मुळात शिवमंदिरच असल्याचा (वादग्रस्त) दावा करणाऱ्या पुस्तकासह अनेक पुस्तके लिहिणारे इतिहास संशोधक पुरुषोत्तम नागेश ओक यांचा जन्म. ‘वर्ल्ड ऑफ वैदिक हेरिटेज : हिंदुइझम अ‍ॅब्रॉड’ हा हजारपानी इंग्रजी ग्रंथ त्यांनी लिहिला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सचिव म्हणून त्यांनी  काम केले होते.
१९३१ >   कवी, निबंधकार, वक्ते आणि चरित्रकथनकार राम शेवाळकर यांचा जन्म. स्वलिखित, संपादित व भाषणसंग्रह मिळून ५० हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. पणजी येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे (१९९४) ते अध्यक्ष होते. ३ मे २००९ रोजी त्यांचे निधन झाले.
१९७३ > गणितज्ञ आणि ‘लीलावती’ या भास्कराचार्यकृत गणित-ग्रंथाचे सटीप मराठी भाषांतरकार नारायण हरी फडके यांचे निधन. ‘भारतीय गणिती’ या पुस्तकातून आर्यभट्ट पहिला याच्यापासून श्रीनिवास रामानुजन यांच्यापर्यंतची परंपरा त्यांनी मांडली होती.
१९४२ > उत्तम बंगाली कादंबऱ्या मराठीत आणणारे शांताराम विठ्ठल मांजरेकर यांचे छिंदवाडा येथे निधन. रमेशचंद्र दत्त, जोगेंद्रनाथ चौधुरी हे बंगाली लेखक त्यांनी ‘राजा तोडरमल’, ‘ भयंकर बादशहा’ या कादंबऱ्यांद्वारे मराठीत आणले.
– संजय वझरेकर

Story img Loader