आभा बर्वे-दीक्षित
मानवी बुद्धिमत्ता व प्रश्न सोडवण्याची क्षमता यांचे अनुकरण संगणक आणि यंत्रांनी करण्यासाठी विकसित झालेले तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. गेल्या काही दशकांमध्ये विदा (डेटा) मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेला आहे. याचबरोबर विदामधून माहिती काढण्यासाठी उपलब्ध असलेली तंत्रे (अल्गोरिदम) आणि आधुनिक संगणकीय क्षमता यात झालेल्या विकासामुळे यांवर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्राच्या विकासाला चालना मिळाली आहे.
सतत काम व ताणामुळे किंवा परिपूर्ण माहितीअभावी माणसाकडून कामांमध्ये चुका होऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रांकडून अशा चुका टाळल्या जातात. त्यामुळे ही यंत्रे मानवापेक्षा जास्त सुरक्षित पद्धतीने कामे करू शकतात. एखाद्या डॉक्टरच्या निदानामध्ये कदाचित मानवी चूक होऊ शकते, परंतु यंत्र-शिक्षण किंवा ‘सखोल शिक्षण तंत्रज्ञान’ हे दिलेल्या विदावर आधारित निर्णय घेत असल्यामुळे चुका होण्याची शक्यता मानवापेक्षा खूप कमी असते.
हेही वाचा:कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
मानवाला सलग आठ ते दहा तास कार्यक्षमतेने काम करता येते, त्यानंतर त्याची कार्यक्षमता मंदावत जाते, तसेच काम करण्याची क्षमता ही वयानुसार कमी होत जाते. यंत्रे आणि संगणक हे २४ तास सर्व दिवस तितक्याच कार्यक्षमतेने काम करू शकतात. विविध वेबसाइटवर असलेले चॅटबॉट तसेच आरोग्य यंत्रणा यासारख्या २४ तास गरजेच्या असलेल्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेली यंत्रे मानवाचे काम सोपे व अधिक काळजीपूर्वक करू शकतात.
या दोन्ही पद्धतीच्या कामांमध्ये संगणक प्रणालीला लोकांचा वैयक्तिक विदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो. या विदांची गोपनीयता जपली जावी तसेच कोणताही दुरुपयोग होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेण्याची गरज असते. ही काळजी घेतली गेली नाही तर या माहितीच्या आधारे सायबर गुन्हे होऊ शकतात. सध्याच्या यंत्रणा विदा सुरक्षित राहावा यासाठीच्या योग्य त्या खबरदारी व योग्य त्या उपाययोजना करत असतात, तरीही आपली वैयक्तिक गोपनीय माहिती या प्रणालीला देताना ती प्रणाली विश्वासार्ह आहे का याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.
हेही वाचा:कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्णयांची अंमलबजावणी
तसेच या प्रणालींमध्ये वापरण्यात येणारा विदा योग्य असणे गरजेचे असते. विदामध्ये असलेली मानवी मते आणि माणसांचा कल, एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे असलेल्या प्रवृत्ती यांची माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमध्येसुद्धा यंत्र व सखोल शिक्षणाद्वारे येऊ शकते. अशा प्रकारच्या प्रणालींद्वारे घेतले जाणारे निर्णय पक्षपाती असण्याची शक्यता असते. असे झाल्यास मोठ्या सामाजिक व कायदेशीर समस्या उद्भवू शकतात.
आभा बर्वे-दीक्षित
मराठी विज्ञान परिषद