माणसांची कल्पनाशक्ती हीच त्यांच्या नवनिर्मितीची मुख्य प्रेरणा असते. अगदी हुबेहूब माणसासारखे दिसणारे आणि माणसासारखेच काम करणारे एखादे यंत्र असावे, असे स्वप्न माणसांनी फार प्राचीन काळापासून पाहिले आहे. आज एकविसाव्या शतकात माणसाचे हे स्वप्न ह्यूमनॉइड यंत्रमानवांच्या रूपाने पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ह्यूमनॉइड यंत्रमानव म्हणजे मानवसदृश यंत्रमानव!

महान गणितज्ञ अॅलन ट्युरिंग यांनी ‘‘यंत्रांना विचार करता येईल का’’ असा प्रश्न विचारला आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरील संशोधनाला जोमाने सुरुवात झाली, त्यानंतर ‘ह्यूमनॉइड यंत्रमानव शास्त्राची’ सुरुवात झाली. ह्यूमनॉइड यंत्रमानव शास्त्र हा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानवशास्त्र यांचा मिलाफ आहे.

smart wearables loksatta article
कुतूहल: स्मार्ट परिधानीय (स्मार्ट वेअरेबल्स)
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
article nobel prize winner south korean author han kang
विश्व साहित्याला गवसलेला नवा सूर
article about psychological effects of bossy behavior on colleagues
इतिश्री : भावनांची सर्वव्यापी जाणीव
effective use of artificial intelligence in bhabha atomic research centre
कुतूहल : बीएआरसी आणि टीआयएफआर
an overview of explainable artificial intelligence
 कुतूहल : पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोजन
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
book The only person you are destined to become is the person you decide to be
क्षमताविकासाचे सूत्र

ह्यूमनॉइड यंत्रमानव शास्त्राचा उद्देश ‘‘माणसांना पर्याय ठरतील अशी यंत्रे निर्माण करणे,’’ असा नसून माणसांना पूरक ठरेल असे नवे साधन तयार करणे हा आहे. माणसाने आतापर्यंत जी अनेक यंत्रे शोधली त्यापेक्षा ह्यूमनॉइड हे मूलभूतदृष्ट्या वेगळे यंत्र आहे. धोकादायक, कंटाळवाणी, पुनरावृत्ती असलेली, श्रमाची कामे करणारे यंत्रमानव आजही वापरात आहेत पण ह्यूमनॉइड्सची रचना दैनंदिन वातावरणात, माणसांच्या बरोबरीने सुरक्षितपणे काम करण्यासाठी केली गेली आहे. ह्यूमनॉइडचा वापर माणसांच्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी केला जाईल. ह्यूमनॉइड्स आपल्या गरजांशी जुळवून घेतील आणि काही मानवी मर्यादांवर मात करण्यासाठी आपल्याला मदत करतील.

माणूस आणि यंत्र यांच्यात बराच फरक असतो. माणसांना भावना असतात. सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती ही तर माणसांची खास वैशिष्ट्ये आहेत. माणसांना नैतिकतेची जाण असते. हे सारे यंत्रांमध्ये निर्माण करणे सोपे नसले तरी अशक्य मात्र नाही. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या माणसांच्या अगदी जवळ जाणारे ह्यूमनॉइड्स पुढच्या काही वर्षांत निर्माण होतील. हे ह्यूमनॉइड्स वैद्याकीय क्षेत्रात परिचारिका किंवा रुग्णांना सोबत व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जातील. हॉटेल, सुपरमार्केट, गोदामे अशा ठिकाणी माणसांच्या बरोबरीने काम करण्यासाठी, वृद्ध व्यक्तींना सोबत करण्यासाठी, स्कुबा डायव्हिंग, पॅरा ग्लायडिंग अशा साहसी खेळांमध्ये मदतनीस म्हणून, कार्यालयात स्वागत करण्यासाठी अशा अनेक ठिकाणी ह्यूमनॉइड्स वापरले जातील.

ह्यूमनॉइड यंत्रमानवशास्त्रात जसजशी प्रगती होईल, तसतसे मानवी मन म्हणजे काय? माणसांमध्ये आढळणाऱ्या भावना, बुद्धी, चेतना, प्रेरणा या साऱ्याचा उगम कसा झाला? अशा अतिशय मूलभूत प्रश्नांचा नव्याने उलगडा होऊ शकेल.