माणसासारखा दिसणारा ह्युमनॉइड बनवण्यात जपानी लोक सुरुवातीपासून आघाडीवर आहेत. १९७० च्या दशकात दोन पायांवर चालू शकणारा आणि काही जपानी शब्द उच्चारणारा पहिला ह्युमनॉइड जपानी संशोधकांनी विकसित केला. त्याला ‘वबॉट-१’ असे नाव दिले गेले. वबॉट-१ला दृष्टी होती, त्याला एखादी वस्तू इकडून तिकडे ठेवता येत असे. त्या काळात तंत्रज्ञान आजच्याइतके पुढारलेले नसल्यामुळे पुढे दहा वर्षांनी वबॉट-२ हा ह्युमनॉइड विकसित केला गेला. या ह्युमनॉइडला चक्क पियानो वाजवता येत असे. कालांतराने होंडा या कंपनीने पी-२, पी-३, पी-४ असे एकापेक्षा एक वरचढ ह्युमनॉइड्स विकसित केले. त्यांना माणसांसारखेच चालता येते हे बघून सगळ्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेतल्या प्रगतीमुळे ह्युमनॉइड्सना एखाद्या वेळेस विचार करता येईल; पण माणसांसारखे चालता येणे फार कठीण जाईल असेच वाटत होते. सुरुवातीचे ह्युमनॉइड्स विद्यापीठात बनवले गेल्यामुळे काहीसे ओबडधोबड होते. पण होंडा कंपनीने अतिशय व्यावसायिक पद्धतीने ह्युमनॉइड्स बनवल्यामुळे या शास्त्रात क्रांती होऊन एकापेक्षा एक सरस असे ह्युमनॉइड्स जगभरात तयार केले जाऊ लागले.

खरी खळबळ माजली ज्या वेळी ‘हॅन्सन रोबोटिक्स’ या कंपनीने बनवलेल्या ‘सोफिया’ या स्त्रीसारख्या दिसणाऱ्या ह्युमनॉइडने अमेरिकेतल्या ऑस्टिन इथल्या ‘साऊथ बाय साऊथ वेस्ट’ या प्रदर्शनात प्रवेश केला तेव्हा! सोफियाचा चेहरा आखीव-रेखीव, साधारण इजिप्तची राणी नेफरतीतीच्या चेहऱ्यासारखा आहे. सोफियाला विचारलेले प्रश्न कळतात आणि त्यांची उत्तरे ती उत्तम रीतीने देते. सोफियाला हे कसे जमते? तिच्यात संभाषणकला निर्माण व्हावी म्हणून ‘ओपनकॉग’सारखी कृत्रिम बुद्धिमत्तेतील साधने वापरली आहेत. सोफिया ‘स्पीच रेकग्निशन बुद्धिमत्ता’ हे कृत्रिम साधन वापरून समोरचा माणूस काय सांगत आहे, हे समजून घेते. नंतर नैसर्गिक भाषा संस्करण हे साधन वापरून जे ऐकले त्याचे विश्लेषण करते. त्यावर विचार करते, उत्तरही शोधते. शेवटी ‘टेक्स्ट टू स्पीच’ हे साधन वापरून ती उत्तर देते.

Loksatta kutuhal Commencement of commercial production of humanoid designs
कुतूहल: नव्या प्रकारचे ह्युमनॉइड्स
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Loksatta kutuhal Kevin Warwick British Cybernetics researcher Vice Chancellor of Coventry University
कुतूहल: केविन वॉरविक
Loksatta kutuhal Humanoids Computer Vision Computational vision Human humanoid
कुतूहल: ह्युमनॉइडचे प्रशिक्षण
Loksatta editorial Election commission declare assembly poll in Jammu Kashmir and Haryana
अग्रलेख: ‘नायब’ निवृत्तीचा निर्णय
doctors protest in Kolkata against Rape and Murder Case
अग्रलेख : मुली, तू जन्मूच नकोस…
independence day 2024
अग्रलेख: स्वातंत्र्य… आपले आणि त्यांचे!
loksatta editorial on Hindenburg Sebi Row
अग्रलेख: संशयकल्लोळातून सुटका!

एकट्या राहणाऱ्या अपंग किंवा वयोवृृद्ध व्यक्तीसोबत सतत कोणी तरी असावे, त्यांचा एकटेपणा दूर व्हावा या उद्देशाने सोफियाची निर्मिती केली गेली आहे, असे या कंपनीचे म्हणणे आहे. सोफियाला सौदी अरेबियाने चक्क नागरिकत्वही दिले. सोफियासारखे नव्या प्रकारचे नागरिक माणसांचे आयुष्य इतर कोणत्याही यंत्रापेक्षा जास्त सुखकारक करतील अशी अपेक्षा आहे.-प्रा. माधवी ठाकूरदेसाई