पृथ्वीवरील नानाविध भूप्रदेशांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेश म्हणजे टुंड्रा प्रदेश होय. तो उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियाच्या उत्तरेकडच्या पट्ट्यात, पूर्व-पश्चिम पसरलेला असून, जवळपास सपाट, वृक्षहीन, विस्तीर्ण भूभाग आहे. उत्तर गोलार्धात वृक्षवाढीची उत्तरेकडची सीमा संपते तिथून ते हिमटोपांचा (आइसकॅप) भाग सुरू होईपर्यंत टुंड्रा प्रदेशाचा विस्तार आहे.

इथले तापमान दीर्घकाळ शून्याखाली असल्याने जमीन गोठलेली असते. हिवाळ्यात सूर्यप्रकाश जवळजवळ नसल्याने दीर्घकाळ रात्र असते. वर्षातील दोन-तीन महिन्यांचा काळच वनस्पतींच्या वाढीसाठी अनुकूल असतो. या काळात जमिनीवरचे बर्फ वितळले, तरी त्याखालची जमीन गोठलेली असल्याने जागोजागी छोटे तलाव आणि पाणथळ जागा निर्माण होतात. या तथाकथित उन्हाळ्यातही सरासरी तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते. तर हिवाळ्यात जमीन आणि पाणी गोठल्यामुळे वातावरणात बाष्पाचा अभाव असतो. अतिथंड वारे जोरदार वाहतात. यालाच आर्क्टिक हवामान म्हणतात.

people among the Kumbh Mela pilgrims contributed to the resolve traffic jam
गेले संगमस्नानास अन् ओंजळीत वाहतूक नियंत्रणाचे पुण्य!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
gangster subhash singh to bring in vasai in samay chauhan murder case after discharge from hospital
गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर अखेर कारागृहात; समय चौहान हत्याकांडात वसईत आणण्याचा मार्ग मोकळा
Implementation of Uniform Civil Code UCC begins in Uttarakhand
समान नागरी कायद्याचे राज्य; भाजपच्या आश्वासनपूर्तीची उत्तराखंडमधून सुरुवात
Dombivli Viral Video
Dombivli : तिसऱ्या मजल्यावरुन पडूनही एका माणसाच्या प्रसंगावधानामुळे वाचला दोन वर्षांचा चिमुकला, डोंबिवलीतल्या देवीपाडा भागातली घटना
response on loksatta article
लोकमानस : चिंता सर्वांनाच, दखल मात्र नाही!
Mohan Hirabai Hiralal gadchiroli loksatta news
व्यक्तिवेध : मोहन हिराबाई हिरालाल
loksatta readers response marathi news
लोकमानस : वृक्ष, रस्ते, कचरा सारे काही गायब

हेही वाचा : कुतूहल : सहारा वाळवंट

येथील मृदा सेंद्रिय द्रव्यांनी समृद्ध आहे; पण अवमृदा (सबसॉइल) गोठलेली असल्याने फारच थोड्या वनस्पती इथे दिसतात. त्यामुळे मातीची माफक गरज असणाऱ्या शैवालवर्गीय (लायकेन) आणि हरितवर्गीय (मॉस) वनस्पती आढळतात. त्यांची वाढ तुरळक असते. परंतु जिथे त्या आढळतात तिथे दाटीने वाढलेल्या दिसतात. इथल्या अल्पकालीन उन्हाळ्यात पटकन रुजून झटपट फुलतील अशा जमिनीलगत वाढणाऱ्या वनस्पती उगवतात. गवतांचे प्रकार, लव्हाळी, ठेंगणी झुडपे अशा वनस्पतीही आढळतात. यातील काही वनस्पतींवर उन्हाळ्यात देखणी फुले उगवतात. हा टुंड्रा प्रदेश आर्क्टिक वृत्ताच्या आसपासच्या भूमीवर असल्याने त्याला ‘आर्क्टिक टुंड्रा’ असेही म्हणतात. या पट्ट्याला सुसंगत असा प्रतिपट्टा दक्षिण गोलार्धात आढळत नाही. दक्षिणेकडे असलेल्या अंटार्क्टिक वृत्ताच्या आसपास भूमी फारशी नाही. बहुतकरून महासागरच आहे. तथापि त्याच्या दक्षिणेस अंटार्क्टिका खंडावर टुंड्रासदृश स्थिती असल्याने त्याला ‘अंटार्क्टिक टुंड्रा’ म्हणतात. तर जगातील उंच पर्वतांच्या माथ्यालगतच्या टापूंवर टुंड्रासदृश स्थिती आढळते. अशा टापूंना ‘अल्पाइन टुंड्रा’ अशी संज्ञा आहे.

हेही वाचा : कुतूहल : भूजल आणि हवामानबदल

वन्यजीवनात विविधता कमी आहे. यातील ध्रुवीय अस्वल, रेनडियर (हिमहरीण), आर्क्टिक ससा, कस्तुरी बैल, आर्क्टिक लांडगा, हिमखोकड, हिमघुबड, टारमिगन (पखुर्डीसदृश पक्षी) हे काही वन्यजीव होत. टुंड्रा प्रदेश खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि युरेनियम या खनिजांनी संपन्न आहे. मात्र तीव्र हवामानामुळे मनुष्यवस्ती विरळ आहे. लॅप, सामोयेडिक, एस्किमो अशा काही जमाती इथे हजारो वर्षे राहत आहेत. जागतिक हवामान बदलामुळे इथल्या तापमानात वाढ होऊ शकते. परिणामी अवमृदा वितळण्याची शक्यता असल्याने इथल्या सजीव सृष्टीत भविष्यात बदल संभवतात.

डॉ. संजीव बा. नलावडे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader