कृत्रिम बुद्धिमत्तेने पासवर्डची फोड (पासवर्ड क्रॅकिंग) कशी केली जाते, हे जाणून घेऊया… आजच्या युगात आपण आपल्या बहुतेक सर्वच कामांसाठी संगणकावर अवलंबून असतो जसे की, बँकेसंबंधी व्यवहार, कचेरीमधील कामे आणि प्रवासवाहनांची तिकिटे आरक्षित करणे इत्यादी. यासाठी आपल्याला वेगवेगळ्या तयार प्रणाल्या वापराव्या लागतात. त्यांच्या उपयोगासाठी एका पूर्वनियोजित पासवर्डची गरज भासते, जो आपणच ठरवलेला असतो. हा शब्द प्रत्येक प्रणालीसाठी वेगळा आणि जटिल ठेवणे अपेक्षित असते. कारण पासवर्ड सोपा असल्यास तो उलगडण्यास जास्त वेळ लागत नाही. जितक्या जास्त प्रणाल्या, तितके जास्त पासवर्ड्स. सोयीसाठी बहुतेक वेळा आपण एकच पासवर्ड शब्द बऱ्याच ठिकाणी वापरतो, मात्र हा शब्द जर संगणकीय शर्विलकांनी म्हणजेच सायबर हॅकर्सनी उकलला तर खेळ खल्लास.

हेही वाचा >>> कुतूहल: सायबर गुन्हे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट

आपल्या प्रियजनांचे नाव, जन्मतारीख किंवा गाडीचा क्रमांक वापरून परवलीचे शब्द ठेवण्याकडे आपला कल असतो. पूर्वी असे शब्द उकलण्यासाठी, संगणक सामान्यपणे वेळखाऊ ‘शब्दांचा भडिमार’ अशा धोपटमार्गाचा (ब्रूट फोर्स) वापर करत असे. पण कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त संगणकाला व्यक्तीचे नाव, तिच्या आप्तेष्टांची नावे, जन्म किंवा तत्सम महत्त्वाच्या तारखा अशी माहिती पुरवल्यास, तो त्याच्या प्रगत आज्ञावलींनी वेगवेगळी संयुगे वापरून (कॉम्बिनेशन्स) बऱ्याच प्रमाणात अचूक संभाव्य उत्तरे काढून दाखवेल. अशी वैयक्तिक माहिती अनेक माहिती साठ्यांतून आता मिळू शकत असल्याने त्यांचे भयावह परिणाम दिसू शकतील! सध्या उपलब्ध कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून परवलीच्या शब्दाची फोड करण्याचा वेळ तक्त्यात दिला आहे. तरी आपले पासवर्ड्स अधिकाधिक क्लिष्ट तसेच आपल्या वैयक्तिक गोष्टींशी संबंध नसलेले असावे.

वैभव पाटकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

सकेंतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader