कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे माणूस आपली सर्जनशीलता गमावून बसेल का, असा प्रश्न अलीकडे विचारला जातो. या प्रश्नाकडे बघताना मुळात सर्जनशीलता येते कुठून, या प्रश्नाचे उत्तर शोधणे योग्य ठरेल. काही जणांच्या मते जन्मत:च माणसामध्ये सर्जनशीलता असते. इतर काही जणांच्या मते मात्र सर्जनशीलतेचे वरदान असे जन्मापासून मिळत नसून ती जोपासावी लागते. कदाचित या दोन्हींचे मिश्रण होऊनही सर्जनशीलता निर्माण होत असावी. अशा प्रकारे विविध गोष्टींमध्ये रस असणे, स्वनिर्मितीची ओढ असणे या वाटेने माणूस जात असावा.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे माणसाची सर्जनशीलता नष्ट होण्याची भीती आततायी वाटते. याचे कारण म्हणजे सर्जनशील माणूस हा स्वानंदामध्ये बुडालेला असतो. त्याला इतर जगाचे काय सुरू आहे याच्याशी त्याच्या नवनिर्मितीच्या काळात काहीही देणे-घेणे नसते. स्वाभाविकपणे असा माणूस तंत्रज्ञानाच्या आहारी जाण्याची शक्यता फार कमी असते. उलट चातुर्याने तो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपली कौशल्ये आणखी परिपक्व करण्यासाठी करेल. जिथे आपला वेळ फुकट वाया जातो किंवा आपल्याला विनाकारण परिश्रम करावे लागतात अशा कामांमध्ये तो हे तंत्रज्ञान सुयोग्यरीत्या वापरेल. यामुळे त्याला आपल्या मुख्य कामाकडे जास्त लक्ष देणे आणि त्यामध्येच सगळा वेळ ओतणे शक्य होईल.

artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
positive artificial intelligence
कुतूहल : भारताला गरज सकारात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेची!
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
Loksatta kutuhal The journey of artificial intelligence in India
कुतूहल: भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल
speed of vehicles on Mumbai Pune Expressway will now be controlled by AI based cameras
सावधान! आता ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे होणार कारवाई… कोठे आणि कशी यंत्रणा ?

हेही वाचा >>> कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता

अर्थात यानिमित्ताने एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला येतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे जर इतर माणसे फारच व्यवहारी झाली आणि त्यांनी खरोखर सर्जनशील असलेल्या लोकांनाच महत्त्व देणे बंद केले तर? उदाहरणार्थ सगळी चित्रे, सगळा मजकूर हे सगळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाकडूनच तयार करून घेतले तर चित्रकाराची आणि लेखकाची गरजच काय? अशा वेळी सर्जनशील माणसाला आपण करत असलेली नवनिर्मिती नेमकी कशासाठी आणि कुणासाठी करत आहोत; असे प्रश्न नक्कीच पडू लागतील. तसेच यावर जर त्या माणसाचा उदरनिर्वाह चालत असेल तर हा निव्वळ तार्किक मुद्दा न राहता तो खरोखरचा प्रश्न बनेल. यामुळे निव्वळ सर्जनशीलता हा एकच निकष न लावता त्याच्या जोडीला उपयुक्ततेचा निकषही इथे लावणे योग्य ठरेल. कृत्रिम बुद्धिमत्तेची उपयुक्तता कदाचित मानवी सर्जनशीलतेला मारक ठरू शकेल; असे आपण नक्कीच म्हणू शकतो. या संदर्भात उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा ज्याला आपण नवनिर्मिती म्हणतो, जी कलाकारी वृत्तीतूनच निर्माण होऊ शकते तिच्या मुळावरच घाला घातला जाऊ शकतो.

अतुल कहाते

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader