चंद्रावर १९६९-१९७२ च्या दरम्यान केलेल्या अपोलो मोहिमांना ५५ वर्षे उलटून गेल्यानंतर, २०२५ साली माणूस ‘आर्टेमिस’ मोहिमेअंतर्गत चंद्रावर परत जात आहे. यावेळी फक्त चंद्रावर जाऊन परत येण्याचे नाही तर तिथे प्रयोगशाळा आणि वसाहत बांधण्याचे ध्येय आहे. येत्या दशकांमध्ये मंगळावर पोहोचून तिथे वसाहत बांधण्याच्या योजना आखल्या जात आहेत. चंद्र आणि मंगळावरील मोहिमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सची साथ मोलाची ठरणार आहे.

सध्याच्या काळात चंद्र आणि मंगळावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित रोव्हर्स आणि स्वयंचलित रोबोट्स काम करत आहेत. मंगळावर पाठवलेल्या क्युरिऑसिटी आणि पर्सिव्हिअरन्स रोव्हर्समध्ये ‘एजिस’ नावाचे (ऑटोनॉमस एक्सप्लोरेशन फॉर गॅदरिंग इन्क्रिज्ड सायन्स) कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रारूप वापरले जाते. एजिस मॉडेल न्यूरल नेटवर्कवर आधारित असून यात सखोल शिक्षण (डीप लर्निंग) आणि संगणकीय दृष्टीचा (कॉम्पुटर व्हिजन) वापर केला जातो. एजिसच्या आधारे रोव्हर मंगळावर मानवी हस्तक्षेपाशिवाय मार्ग शोधू शकते, काही प्रमाणात प्रयोग करू शकते.

On December 13 and 14 there will also meteor shower in space and feast for astronomy lovers
आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Mercury Rise in Scorpio
‘या’ चार राशींचे भाग्य उजळणार, बुध ग्रहाच्या कृपेने मिळणार अपार संपत्ती
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Gajakesari Raja Yoga
१३ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर पैसा; गजकेसरी राजयोगाच्या प्रभावाने आयुष्यात येणार धनसंपत्तीचे सुख

अंतराळ मोहिमांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले रोबोट्स वापरले जातात. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर सायमन (र्क्यू इंटरॅक्टिव्ह मोबाइल कम्पॅनियन) नावाचा रोबोट वापरला जातो. सायमनला मानवी भाषा अवगत असून तो अंतराळप्रवाशांशी संवाद साधतो, विविध कामांसाठी साहाय्यक माहिती पुरवतो. नासाने ‘व्हल्करी’ नावाचे मानवसदृश रोबोट्स बनवले आहेत. या रोबोट्सना अनेक प्रकारची कामे करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. आर्टेमिस मोहिमेअंतर्गत चंद्रावर बांधकाम करण्यासाठी, तिथले पदार्थ गोळा करण्यासाठी, ज्या कामात जोखीम आहे तिथे मानवी जीव धोक्यात न घालता या रोबोट्सचा वापर केला जाईल. चंद्रावर बांधकाम करण्याच्या प्रकल्पासाठी नासाने ‘एआय स्पेसफेक्टरी’ नावाच्या कंपनीशी करार केला आहे. एआय स्पेसफेक्टरी ही चंद्रावर उपलब्ध साधनांचा वापर करून रोबोट्सच्या आधारे त्रिमिती प्रिंटिंग पद्धतीचा वापर करून तिथे बांधकाम करेल. हीच पद्धत पुढे मंगळावरील बांधकामासाठी वापरली जाईल. चीनमधील शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक रोबोट बनवला आहे जो मंगळावर ऑक्सिजननिर्मितीसाठी मदत करू शकतो. हा शोध लावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेने मंगळावरील उल्कांचे गुणधर्म आणि रासायनिक प्रक्रियांचे सिम्युलेशन करणे सुरू करण्यात आले आणि त्या आधारे कार्यक्षम उत्प्रेरक (केटेलिस्ट) तयार केले गेले जे ऑक्सिजननिर्मितीसाठी मदत करू शकते. या प्रोग्रॅमच्या आधारे मंगळावरील दगडांचा आणि खनिजांचा वापर करून वसाहतीसाठी उपयुक्त असे इतरही घटक तयार करता येतील.

Story img Loader