इंग्रजी भाषा बऱ्याच माणसांना लिहिता-वाचता येते, पण बोलताना अडचण येते. कारण आत्मविश्वासाची कमतरता, सरावाचा अभाव किंवा संकोच! हे अडथळे दूर करण्यासाठी गूगलच्या जेमिनी या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रारूपाशी बोलण्याचा सराव करता येतो. हे वैशिष्टय़ (फीचर) गूगलच्या ‘सर्च लॅब्स’ या मंचात नुकतेच समाविष्ट झाले असून ते इंग्रजी संभाषणकौशल्य सुधारण्यासाठी मदत करते. यात यंत्र शिक्षण अल्गोरिदम आणि संगणकीय भाषाशास्त्राचा एकत्रित वापर केला जातो. अ‍ॅमेझॉनचे अ‍ॅलेक्सा, अ‍ॅपलचे सिरी, गूगलचे गूगल असिस्टंट ही संभाषणात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची उदाहरणे आहेत. यात प्रगत नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि स्वयंचलित उच्चार ओळख (ऑटोमॅटिक स्पीच रेकग्निशन) या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींचा वापर करतात. अ‍ॅलेक्सा व सिरी सूचना समजून घेतात आणि सव्‍‌र्हरकडे पाठवतात. माहिती साठवण्याइतकी त्यांची मेमरी नसते आणि तिच्यावर प्रक्रिया करण्याइतकी कम्प्युटिंग क्षमता नसते. या प्रणाली सव्‍‌र्हरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे माणसाने विचारलेल्या प्रश्नांना क्षणार्धात उत्तर देतात. संभाषणातून दिलेल्या आज्ञांचे पालन करतात. गूगल असिस्टंट हा स्मार्टफोन आणि अँड्रॉइड स्मार्ट मनगटी घडय़ाळे यांत आवाज मदतनीस म्हणून कार्य करतो.

नोकरी भरती प्रक्रियेत उमेदवाराने आपली कागदपत्रे प्रत्यक्षात आणून दाखविण्याची वेळखाऊ प्रक्रिया संभाषणात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे स्वयंचलित करता येते.

uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
season do hair lice occur
केसातील उवा कोणत्या ऋतूमध्ये होतात? त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय…
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!
loksatta kutuhal facial recognition with artificial intelligence
कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवणे १
सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस

दोन भिन्न भाषा जाणणाऱ्या व्यक्ती जेव्हा एकमेकांशी संवाद करू इच्छितात तेव्हा संभाषणात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भाषा भाषांतर प्रक्रियेचा वापर केल्याने ताबडतोब एकमेकांचे संभाषण समजू शकतात. उदाहरणार्थ- माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी भाषेतून आणि बिल गेट्स यांनी इंग्रजी भाषेतून एकमेकांशी समोरासमोर साधलेला संवाद. या तंत्रज्ञानामुळे दुभाषाची गरज भासत नाही. ग्राहक सेवेत संभाषणात्मक कृत्रिम बुद्धिमत्ताचालित चॅटबॉट्सचा वापर ग्राहकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, साध्या विनंत्या हाताळण्यासाठी, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केला जातो. उत्पादनकर्ता आपल्या उत्पादनाची शिफारस करून तेच का घ्यावे हे पटवून देऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ताचालित चॅटबॉट्समध्ये नैसर्गिक भाषा प्रक्रियेचा वापर केल्यामुळे मानवी संभाषण समजून घेऊन त्याला योग्य प्रतिसाद दिला जातो. तसेच यात यंत्र शिक्षणाचा वापर केल्याने चॅटबॉट्स परस्परसंवादातून शिकतात व ग्राहकांना अधिक चांगली माहिती देतात. संभाषणात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान दिवसेंदिवस अधिक प्रमाणात विस्तारत आहे आणि निरनिराळय़ा व्यवसायात तसेच सर्व लोकांना उपयोगी पडत आहे.

डॉ. सुनंदा ज. करंदीकर,मराठी विज्ञान परिषद