इंग्रजी भाषा बऱ्याच माणसांना लिहिता-वाचता येते, पण बोलताना अडचण येते. कारण आत्मविश्वासाची कमतरता, सरावाचा अभाव किंवा संकोच! हे अडथळे दूर करण्यासाठी गूगलच्या जेमिनी या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रारूपाशी बोलण्याचा सराव करता येतो. हे वैशिष्टय़ (फीचर) गूगलच्या ‘सर्च लॅब्स’ या मंचात नुकतेच समाविष्ट झाले असून ते इंग्रजी संभाषणकौशल्य सुधारण्यासाठी मदत करते. यात यंत्र शिक्षण अल्गोरिदम आणि संगणकीय भाषाशास्त्राचा एकत्रित वापर केला जातो. अॅमेझॉनचे अॅलेक्सा, अॅपलचे सिरी, गूगलचे गूगल असिस्टंट ही संभाषणात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची उदाहरणे आहेत. यात प्रगत नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि स्वयंचलित उच्चार ओळख (ऑटोमॅटिक स्पीच रेकग्निशन) या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींचा वापर करतात. अॅलेक्सा व सिरी सूचना समजून घेतात आणि सव्र्हरकडे पाठवतात. माहिती साठवण्याइतकी त्यांची मेमरी नसते आणि तिच्यावर प्रक्रिया करण्याइतकी कम्प्युटिंग क्षमता नसते. या प्रणाली सव्र्हरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे माणसाने विचारलेल्या प्रश्नांना क्षणार्धात उत्तर देतात. संभाषणातून दिलेल्या आज्ञांचे पालन करतात. गूगल असिस्टंट हा स्मार्टफोन आणि अँड्रॉइड स्मार्ट मनगटी घडय़ाळे यांत आवाज मदतनीस म्हणून कार्य करतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा