कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित क्लारा इंडरनॅक (केआय) हे अत्यंत प्रगत असे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने बनवलेले साधन न्यूजरूममध्ये उपयोगात आणले जात आहे. क्लारा हे अत्याधुनिक व प्रभावी साधन असून, खूप प्रमाणात शोधकार्य करून योग्य शब्दांची निवड करते त्यामुळे ते प्रभावी व आशयघन वाक्यरचना करते. हे करताना उपलब्ध माहितीतून केवळ उपयुक्त माहितीच अत्यंत परिश्रमाने परंतु तात्काळ निवडते. क्रिकेट, फुटबॉल किंवा हॉकीसारख्या गतिमान खेळांचे धावते वर्णन करताना ते खूपच उपयुक्त आहे. खेळ गतिमान असल्यामुळे धावते वर्णन करताना आयत्याक्षणी योग्य व चपखल शब्द सुचवते. तसेच ही पद्धत वृत्तपत्रीय आणि वैचारिक लेखनासाठीही अत्यंत उपयुक्त आहे असे अनेक पत्रकारांना वाटते. क्लाराने निर्माण केलेल्या लेखांचे/ लेखनाचे मानवी संपादकांनी नेटके संपादन केल्यास बातमीतील एकसंधता आणि खरेपणा शोधता व अजमावता येतो. या मानव- यंत्र दुकलीच्या ताळमेळामुळे पत्रकारितेतील पारंपरिक मूल्ये अबाधित ठेवता येतात आणि हेच क्लाराचे वैशिष्ट्य आहे. काही पत्रकारांनी तर एकमुखाने या साधनाला पाठिंबा दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा