कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संगणक असुरक्षित केला जाऊ शकतो. हे काम एआय-पॉवर्ड मालवेअरच्या साहाय्याने केले जाते. एखाद्या संस्थेतील संगणकीय अंकीय मालमत्तेभोवती सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी सुरक्षा तज्ज्ञांनी फायरवॉल, हल्ला प्रतिबंध प्रणाली (आयपीएस), अनुमती नियंत्रण पद्धती (अॅक्सेस कंट्रोल सिस्टीम), बहुघटकीय प्रमाणीकरण (मल्टिफॅक्टर ऑथेंटिकेशन) यासारख्या सुरक्षा प्रणाली आणि तंत्रे विकसित केली आहेत. पण जगात १०० टक्के सुरक्षित असे काहीही नाही. अट्टल गुन्हेगार हल्ला करण्यासाठी कोणताही मार्ग वापरतात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आगमनाने त्यांना आता जणू काही जादूचा दिवाच मिळाला आहे. पूर्वी संगणक शर्विलकाला वैयक्तिकरीत्या प्रत्येक प्रणालीवर जाऊन फोड करावी लागत असे. पण आता कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त प्रणाली आपोआप एकाच वेळी बऱ्याच संगणक जालांमध्ये (नेटवर्कमध्ये) जाऊन तिकडील कमकुवत क्षेत्रे शोधून त्यांवर हल्ल्याची योजना करू शकते. त्याशिवाय ज्ञात सुरक्षा प्रणाल्या समजून घेऊन आपल्या प्रणालीत अनुरूप बदल करून न पकडले जाता त्या लक्ष्याला कुचकामी बनवू शकते. हा कल्पनाविलास न राहता प्रत्यक्षात घडत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा