ग्रंथालयातील संग्रहित महत्त्वाचे साहित्य जसे की हस्तलिखिते, दुर्मीळ व जुनी पुस्तके, वृत्तपत्रातील कात्रणे तसेच जुन्या नोंदवह्या आणि ग्रंथालय समिती सभांचे इतिवृत्त हा ऐतिहासिक ठेवा होत जातो. तरी भविष्यासाठी त्याचे जतन करणे कळीचे आहे. स्कॅनिंगची प्रक्रिया करून अशा साहित्याचे अंकीकरण करणे हे जवळपास अनिवार्य झाले आहे. मात्र ते केवळ इलेक्ट्रॉनिक झेरॉक्सिंग मानले जाऊ नये. ती अतिशय सखोल प्रक्रिया असून तिच्यासोबत अनेक मूल्यवर्धन करणाऱ्या लाभदायी बाबींचा समावेश करणे अपेक्षित असते. असा अंकीय संग्रह (डेटाबेस) एकसंध (सीमलेस) असेल हे बघितले पाहिजे. त्यामुळे संग्रहाचा शोध विविध प्रकारे करता येणे, सध्याच्या भ्रमणध्वनीपासून ते आगामी अंकीय साधनांनी संग्रहाचा सुबकपणे वापर शक्य होणे आणि गरज भासल्यास कुठल्याही दस्तावेजाच्या स्वच्छ प्रती काढता येणे, अशा दूरगामी उपयोगाच्या व्यवस्था या अंकीकरण प्रक्रियेत समाविष्ट केल्या गेल्या पाहिजेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा