नोव्हेंबर २०२२च्या अखेरीस ओपन एआयचे ‘चॅट जीपीटी-३’ आंतरजालावर अवतरले आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगतात खळबळ उडाली. यापूर्वी विशेषज्ञ चॅटबॉट्स नव्हते असे नाही; परंतु ‘चॅट जीपीटी-३’चे वेगळेपण दोन कारणांमुळे होते : एक म्हणजे अतिशय मोठय़ा माहितीसंचावर झालेले प्रशिक्षण आणि दुसरे म्हणजे जनरेटव्ह प्री-ट्रेन्ड परिवर्तक (ट्रान्सफॉर्मर्स) नावाच्या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग. असे परिवर्तक, दिलेल्या मजकुरातील जवळच्या आणि दूरच्याही घटकांचे एकत्र विश्लेषण करतात. ही पद्धत विविध आणि विस्तृत मजकुरातील वाक्यांमधले शब्द आणि घटकांच्या संबंधांचे बांध ओळखून तशाच प्रकारची नवी वाक्ये रचायला शिकते. यामुळे दिलेल्या शब्दांनंतर कोणता शब्द येईल, त्याहीनंतर कोणता येईल असे एकामागून एक सांगता येते. गंमत म्हणजे वाक्यातील गहाळ भागसुद्धा अशा प्रकारे पूर्ण करता येतो.

‘जीपीटी’ हे एक भाषेसाठीचे पायाभूत मशीन लर्निग प्रारूप (मॉडेल) आहे. भाषेतील विविध आकृतीबंधांचे गुंतागुंतीचे जाळे साठवण्यासाठी हे प्रारूप बरेच मोठे असते. यामुळेच अशा प्रारूपांना लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) म्हणतात. चॅट जीपीटीशिवाय अनेक मॉडेल्स आता उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, बर्ट, क्लॉड, ल्लामा. या प्रारूपांना प्रशिक्षणादरम्यान आत्मसात केलेल्या कोणत्याही संकल्पनेची खऱ्या अर्थाने जाणीव नसते. मात्र, त्यांची भाषेचे आकृतीबंध ओळखण्याची हातोटी विलक्षण आहे.

Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Makar Sankranti 2025
Makar Sankranti 2025 : १९ वर्षानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी निर्माण होतोय पुष्य नक्षत्राचा संयोग, ‘या’ तीन राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा
AI Identity and Opportunity career news
कृत्रिम प्रतिमेच्या प्रांगणात: एआय : ओळख आणि संधी
Zomato Zepto Swiggy field workers have no legal rights
किती काळ पायदळीच तुडवले जाणार? ‘१० मिनिटांत घरपोच’ देणाऱ्यांचे हक्क

काहींच्या मते या प्रारूपांमधील घटकांच्या आपापसातील गुंतागुंतीच्या आंर्तसबंधांमुळे अशी प्रारूपे सर्जनशील असतात. इतरांच्या मते याच कारणामुळे ती स्वप्नरंजन करतात, शेखचिल्ली बनतात, चुकीची उत्तरे ठोकून देतात. अशामुळे अनेकदा त्यांची उत्तरे व्याकरणदृष्टय़ा अचूक आणि वरवर योग्य दिसत असूनही भरकटलेली आणि भरकटवणारी असतात.

मशीन लर्निगमध्ये अशा मॉडेल्सचे वर्तन काही कळा फिरवून बदलता येते. ‘तापमान’ ही अशीच एक कळ. कमी तापमान असले की सुनिश्चित उत्तरे मिळतात. पण ती पुनरुक्ती असलेली, साचेबद्ध असतात. याउलट तापमान वाढले की मॉडेलच्या उत्तरांमध्ये सृजनशीलता आणि विविधता दिसते. अर्थात अशा सृजनशीलतेमुळे चुकाही संभवतात. अनेकदा तापमान बदलणे ग्राहकाच्या हाती नसते. त्यामुळे अशा मॉडेल्सवर डोळे बंद ठेवून विसंबून राहणे योग्य नाही. मात्र योग्य प्रकारे वापरल्यास शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात यांच्यामुळे क्रांती घडू शकते.

अनेक संसाधनांमध्ये आता भाषेची मोठी प्रारूपे अंतर्भूत होऊ लागली आहेत. इतर प्रारूपांच्या मदतीने त्यांचे रूपांतर दृकश्राव्य माध्यमातही होऊ लागले आहे. त्यामुळे यापुढे सर्वानीच, ऐकीव आणि वाचीव माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी स्रोताचा पडताळा करायला हवा.- आशीष महाबळ, मराठी विज्ञान परिषद

Story img Loader