आपल्यापैकी अनेकांनी चॅटजीपीटी वापरला असेल आणि कधी कधी ते खूप चुकीची उत्तरे देते हा अनुभवही घेतला असेल. अशी उत्तरे देताना त्याला भ्रम झालेला असतो, म्हणजेच तो हॅलुसिनेट झालेला असतो. चॅटजीपीटीची ही भ्रमिष्ट वागणूक इतकी गाजली की केंब्रिज डिक्शनरीने २०२३चा ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून ‘हॅलुसिनेट’ हाच शब्द निवडला!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पण गंभीरपणे पाहायचे तर अब्जावधी शब्दांमधून शिकलेली कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली अशा चुका का करत असेल? याचे एक कारण आहे की विचारलेला प्रश्न आणि उत्तर देण्यासाठी निवडलेली माहिती यातील भाषा समजून घेताना या प्रणाल्या गोंधळू शकतात. त्यांना संदर्भ नीट समजला नाही तर त्या भलतेच उत्तर देतात. दुसरे कारण म्हणजे त्या प्रचंड प्रमाणात माहिती वापरतात आणि त्यातली काही चुकीची असू शकते. आपल्याकडील माहिती बरोबर आहे याची खात्री करून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे नसते. त्यामुळे त्यांची उत्तरे भरकटू शकतात. शिवाय आपणही अजून या प्रणाल्यांना नीट सूचना देण्यास सरावलेलो नाही. या साऱ्याचा परिणाम म्हणजे प्रणालींना होणारा भ्रम.
हेही वाचा >>> कुतूहल : रोबोटिक वाहने
काही वेळा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विसरतेही. दक्षिण कोरियातील एका संशोधक गटाने डीपफेक व्हिडीओ ओळखण्यासाठी एका प्रणालीला खूप उदाहरणे देऊन शिकवले. ती शिकून छान तयार झाली. नंतर काही महिन्यांनंतर तो गट दुसरे डीपफेक व्हिडीओ शिकवायला गेला तर प्रणालीला आधीच्या शिक्षणाचा साफ विसर पडल्याचे आढळले. नवीन माहिती शिकल्यानंतर आधीची माहिती पूर्णपणे विसरण्याच्या या प्रवृत्तीला आकस्मिक विसरणे (कॅटास्ट्रोफिक फरगेटिंग) म्हणतात. अर्थात असे क्वचित होते.
माणूस विसरण्याची अनेक कारणे असतात, पण भरपूर स्मृतिक्षमता वापरणाऱ्या प्रणाली कशा विसराळू होतील? त्याचे कारण न्युरल नेटवर्क प्रणालीच्या कार्यात दडले आहे. नवीन माहिती मिळाली की तिचा अर्थ लावण्यासाठी त्यात नवीन मार्ग रचले जातात. नवीन मार्ग तयार होताना जुने मार्ग नष्ट होणे शक्य आहे त्यामुळे प्रणाली विसरते. पण पुढचे पाठ मागचे सपाट ही परिस्थिती येऊ नये म्हणून नवीन काही शिकवताना अधूनमधून आधीची माहिती देत राहण्याचा उपाय त्यावर आहे. म्हणजे पुढचा धडा शिकण्याआधी आधीच्या धड्याची उजळणी.
अर्थात आजच्या भ्रम होणाऱ्या आणि विसरभोळ्या प्रणाली उद्या तशा राहणार नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकाधिक प्रगत होत जाईल तशा या अडचणी दूर होतील.
डॉ. मेघश्री दळवी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org