कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील दिग्गजांपैकी एक असे ज्युडेया पर्ल हे इस्रायली- अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ आहेत. ते कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी संभाव्य दृष्टिकोन (प्रोबॅबिलिस्टिक अॅप्रोच) आणि बायेसियन नेटवर्कच्या विकासासाठी प्रसिद्ध आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ज्युडेया पर्ल यांचा जन्म तेलअवीव – सध्याचे इस्रायल येथे ४ सप्टेंबर १९३६ रोजी झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विषयात बी.एस. पदवी आणि अमेरिकेतून एम.एस.पदवी प्राप्त केली. त्यांनी १९६५ साली रटगर्स विद्यापीठातून भौतिकशास्त्रातील एम.एस.पदवी मिळविली. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली.
सध्याच्या काळातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया रचण्याचे श्रेय पर्ल यांना जाते. त्यांनी सुपर कंडक्टिव्ह पॅरामेट्रिक अॅम्प्लिफायर्स आणि स्टोअरेज उपकरणे, प्रगत स्मृतिप्रणाली, तसेच संभाव्य (प्रेडिक्टिव्ह) कृत्रिम बुद्धिमत्ता यांवर काम केले आहे. त्या कामामुळे संगणकप्रणाली, अनिश्चिततेचा संदर्भ ठेवून त्यावर प्रक्रिया करू शकतात आणि कारणांचा संबंध परिणामांशी (कॉझल एआय) जोडू शकतात. अनुभवजन्य विज्ञानातील कारणात्मक मॉडेलिंगचे गणित करणारे ते पहिले शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे कार्य उच्चस्तरीय संज्ञानात्मक प्रारूप म्हणूनही प्रसिद्ध आहे.
अलीकडच्या काळातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया ज्युडेया पर्ल यांच्या महत्त्वाच्या यशस्वी कामावर बांधला गेला आहे, ज्यामुळे ड्रायव्हररहित कार आणि आवाज ओळखण्याचे (व्हॉइस रेकग्निशन) सॉफ्टवेअर यांसारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्युडेया पर्ल हे जर्नल ऑफ कॉझल इन्फरन्सच्या संस्थापक संपादकांपैकी एक आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत. त्यांनी सामान्य लोकांना समजेल अशा प्रकारे लिहिलेले ‘द बुक ऑफ व्हाय’ हे कार्यकारणभावावरील पुस्तक प्रसिद्ध आहे.
ज्युडेया पर्ल यांच्या संगणक विज्ञानातील उल्लेखनीय योगदानामुळे अनेक विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला आहे. संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी निरनिराळय़ा संस्थांचे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत. ‘संभाव्यता आणि कारणात्मक तर्कासाठी कॅलक्युलसच्या विकासाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेतील मूलभूत योगदान ‘यासाठी २०११साली ‘सोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशिनरी’ यांनी ज्युडेया पर्ल यांना ‘टय़ुरिंग अॅवॉर्ड’ने सन्मानित केले आहे. टय़ुरिंग अॅवॉर्ड हे संगणक क्षेत्रातील नोबेल पारितोषिकासम मानले जाते.
पर्ल सध्या संगणकशास्त्र आणि संख्याशास्त्र या विषयांचे प्राध्यापक आहेत. तसेच कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉसएंजेलिस येथील संज्ञानात्मक प्रणाली प्रयोगशाळेचे संचालक म्हणून वयाच्या ८८व्या वर्षीही कार्यरत आहेत.
डॉ. सुनंदा ज. करंदीकर, मराठी विज्ञान परिषद