कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असून मानवजातीला क्लिष्ट समस्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासोबत ती वाईट हेतूंसाठीदेखील वापरली जाऊ शकते हे वास्तव आहे. त्यामुळेच, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून होऊ शकणारे निवडक गुन्हे किंवा गैरप्रकार कोणते, हे आपण पाहू आणि ते टाळण्यासाठी याच तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल हेही समजून घेऊ.

तोतया प्रतिमा (डीपफेक इमेज) अर्थात गैरसमज पसरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता खुबीने वापरून व्यक्तीची तोतया छायाचित्रे, चलदृश्ये (व्हिडीओज्) किंवा ध्वनिफिती (ऑडिओज्) तयार करून फसगत करणे, हे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित गुन्ह्यां’चे सर्रास आढळणारे उदाहरण आहे.  एका  प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रतिमा दुसऱ्याच महिलेच्या प्रतिमेवर लादून त्या अभिनेत्रीची बदनामी करणारी अलीकडलीच एक घटना. याशिवाय विद्यमान पंतप्रधान गरबा खेळतानाची दृश्यफीत काही दिवसांपूर्वी बऱ्याच माध्यमांवर झळकली होती, तीही याच तंत्रज्ञानावर आधारित होती. अशाच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने २०२० मध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा आवाज काढून इंग्लंडमधील एका ऊर्जा कंपनीतून सुमारे २४ दशलक्ष डॉलर्स लंपास केले गेले, ही तर या प्रकाराची नांदीच होती. 

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…

अशा प्रतिमा तोतया आहेत की खऱ्या, हे ओळखणे कठीण असते. आपली दृष्टिक्षमता तसेच श्रवणशक्तीमुळे आपण एखादी प्रतिमा बघत असताना मनातल्या मनात काही ठोकताळे बांधत असतो की हा पुरुष किंवा ही महिला अशी दिसली पाहिजे. जेव्हा ती प्रतिमा आपल्या मनातील प्रतिमेशी जुळत नाही तेव्हा आपल्या लक्षात येते की कुठेतरी काहीतरी चुकत आहे! आपण जर बारकाईने पाहिले तर त्या प्रतिमेचा फोलपणा लक्षात येतो. उदाहरणार्थ, त्वचा आणि शरीराच्या काही भागांमधील विसंगती, चेहऱ्यावर नेहमीपेक्षा वेगळे भाव, डोक्यावरचे केस आणि चेहऱ्याच्या ठेवणीतील बदल. दृश्यफितीत अशा विसंगती शोधणे तुलनेने सोपे असते कारण उदाहरणार्थ त्वचेच्या कांतीमधील फरक, धकाधकीच्या हालचाली आणि अवास्तव लकबी चटकन लक्षात येऊ शकतात. ध्वनिफितीमधील विसंगती चुकीची वाक्यरचना, उच्चाराची ढब, आवाजातील अवास्तव उतार-चढाव या प्रकारे शोधता येते.

मात्र कृत्रिम बुद्धिमत्तानिर्मित अशा प्रतिमांचा भडिमार झाल्यास, आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता गोंधळून जाते आणि संगणकीय शर्वविर्लकांचा डाव साध्य होतो. तरी काटय़ाने काटा काढणे याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानानेच या त्रुटी दूर करणे अनिवार्य होईल. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रगत ब्लॉकचेन, डिजिटल वॉटरमार्किंग आणि बहुघटकीय प्रमाणीकरण (मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन) यांचा वापर करता येतो. त्यांचे यश अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्तेचा कुशलतेने वापर करण्यावर आहे. 

 – वैभव पाटकर ,मराठी विज्ञान परिषद