एखाद्या देशाने नागरिकत्व बहाल केलेला पहिला यंत्रमानव म्हणजे सोफिया. सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळालेला यंत्रमानव डेव्हिड हॅन्सन यांनी तयार केला. डेव्हिड हॅन्सन हे अमेरिकन यंत्रमानवशास्त्रज्ञ (रोबोटिस्ट), ‘हॅन्सन रोबोटिक्स’ या हाँगकाँगस्थित रोबोटिक्स कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

हॅन्सन यांचा जन्म २० डिसेंबर १९६९ रोजी अमेरिकेतील टेक्सास (डल्लस) येथे झाला. ‘हायलँड पार्क हायस्कूल’ येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. ‘ऱ्होड आयलँड स्कूल ऑफ डिझाईन’मधून डेव्हिड हॅन्सन यांनी ललित कला विषयात पदवी संपादन केली तसेच टेक्सास विद्यापीठातून परस्परसंवादी कला आणि अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट प्राप्त केली.

Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Raqesh Bapat And Riddhi Dogra
“तो माझा एक्स असला तरी…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम एजेबाबत पूर्वाश्रमीच्या पत्नीचे मोठे विधान; म्हणाली…
Children Dress Up as Lord Hanuman
Viral Video : जेव्हा फॅन्सी ड्रेस कार्यक्रमात चिमुकला बनतो हनुमान; अभिनय नाही तर ‘या’ गोष्टीने जिंकली सगळ्यांची मने
Loksatta kutuhal Artificial omnidirectional intelligence
कुतूहल: कृत्रिम सर्वसमावेशक बुद्धिमत्ता
Chinas Unitry G One Humanoid Robot at IIT Mumbais TechFest is attracting attention
आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये ‘युनिट्री जी वन ह्युमनॉईड रोबोट’ लक्षवेधी धोकादायक ठिकाणी मानवी हस्तक्षेप कमी करण्यास ठरणार उपयुक्त
Eagle robot to be showcased at IIT Bombay Tech Fest Mumbai news
शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविणारा ‘ईगल’,पुण्यातील शाळेत १० ‘यंत्रशिक्षकां’कडून धडे
Loksatta  kutuhal Synthetic Intelligence Many Unanswered Questions
कुतूहल: संश्लेषित बुद्धिमत्ता : अनेक अनुत्तरित प्रश्न

मानवासारखे दिसणारे आणि चेहऱ्यावर मानवी हावभाव असलेले यंत्रमानव तयार करण्यासाठी हॅन्सन प्रसिद्ध आहेत. १९९५ मध्ये एका स्वतंत्र प्रकल्पाचा भाग म्हणून त्यांच्या आवडीनुसार त्यांनी रिमोटने हाताळता येणारे यंत्रमानवी डोके तयार केले. त्याच्या चेहऱ्यावर मानवी हावभाव दिसतील अशी त्याची रचना केली. २००४ मध्ये त्यांनी ‘के-बोट’ हे यंत्रमानवी डोके तयार केले. यात पॉलिमर त्वचा, मोठे निळे डोळे, मानवी चेहऱ्याची बारीकसारीक वैशिष्ट्ये यांचा समावेश होता. तेव्हा डेन्व्हर येथे झालेल्या ‘अमेरिकन असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’च्या परिषदेत हा यंत्रमानव सादर करण्यात आला. या यंत्रमानवाच्या डोक्याच्या हालचालींच्या नियंत्रणाची सोय केली होती तसेच डोळ्यांमध्ये कॅमेरे बसवले होते.

हेही वाचा >>> कुतूहल: भविष्यातील ह्यूमनॉइडचे फायदे आणि तोटे

पदवी प्राप्त केल्यानंतर हॅन्सन यांनी ‘डिस्ने’मध्ये कलाकार म्हणून काम केले. त्यांनी ‘डिस्ने इमेजिनियरिंग प्रयोगशाळे’त शिल्पकार आणि साहित्य संशोधक म्हणूनही काम केले. ‘युनिव्हर्सल स्टुडिओ’ आणि ‘एम टीव्ही’साठी डिझायनर, शिल्पकार आणि रोबोटिक्स डेव्हलपर म्हणून हॅन्सन कार्यरत होते.

२०१६ मध्ये ‘सोफिया’ हा सामाजिक यंत्रमानव तयार करण्यात आला. या यंत्रमानवाचा चेहरा प्राचीन इजिप्तची राणी नेफरतीती, प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेत्री ऑड्रे हेपबर्न आणि हॅन्सन यांची पत्नी अॅमांडा हॅन्सन यांच्या चेहऱ्याशी साधर्म्य असणारा आहे. अनेक चर्चा, संवाद यात सहभाग घेणारी सोफिया तिच्या मानवसदृश हावभावांमुळे लोकप्रिय झाली आहे. यंत्रमानव तयार करण्यामागे हॅन्सन यांचा उद्देश मानवाची मदत व्हावी हा होता. सोफियाव्यतिरिक्त त्यांचा ‘अॅल्बर्ट हुबो’ हा एक यंत्रमानवही प्रसिद्ध आहे.

हॅन्सन यांचा असा विश्वास आहे की, जर आपल्याला यंत्रमानवासोबत प्रभावी संवाद साधायचा असेल तर तो मानवी स्वरूपात असणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, हे मानवासारखे दिसणारे यंत्रमानव हे शिक्षक किंवा सुरक्षारक्षक यांसारख्या विविध भूमिकांमध्ये मानवाशी अधिक प्रभावी जवळीक साधू शकतात.

– अनघा अमोल वक्टे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader