नैतिकता हा अत्यंत वादाचा विषय आहे. एका माणसाच्या दृष्टीने न्याय्य असलेली गोष्ट दुसऱ्या माणसाच्या नजरेतून तशीच दिसेल असे आपण खात्रीने सांगू शकत नाही. यासंबंधीचे समज, निकष, पूर्वग्रह यांच्या बाबतीत अनेक फरक असू शकतात. मुळातच नेमकी सीमारेषा आखणे कठीण असलेल्या या विषयांच्या संदर्भात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाने खूपच खळबळ माजवली आहे. याचे कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे घडू शकणाऱ्या गोष्टी नैतिकतेच्या फुटपट्टीने नेमक्या कशा मोजायच्या याविषयी स्पष्टता आलेली नाहीच; पण आधी उल्लेख केल्याप्रमाणे मुळातच नैतिकतेची व्याख्या करणे काहीसे कठीण असल्यामुळे हा विषय वादग्रस्त ठरतो. देशोदेशी या संदर्भात अनेक पातळ्यांवर काम सुरू आहे. त्यात कायदे करण्यापासून हे तंत्रज्ञान उभे करणाऱ्या लोकांनी नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयीचे संकेत घालून देण्यापर्यंत अनेक प्रयत्न सुरू आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा