मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या वर्गाच्या शिक्षकाला कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त मूल्यांकन प्रणाल्या शीघ्रतेने उत्तरपत्रिका तपासून देण्यात साहाय्य करतात. त्यासोबत प्रत्येक परीक्षेत विद्यार्थी कुठे कमी पडला याचे विश्लेषणही देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण आपली गुणवत्ता वाढवण्यासाठी काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन मिळते. त्याशिवाय शिक्षकाला विषय शिकवताना काय काळज्या घेतल्या पाहिजेत, कुठे अधिक उदाहरणे आणि चित्रे दिली पाहिजेत याबाबत शिफारसी अशा प्रणाल्या देतात. त्याच्या पुढे जाऊन, प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेण्यासही त्या सक्षम असतात, ज्यामुळे निरंतर मूल्यमापन करणे सहज शक्य होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in