कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावी वापर चेहऱ्यावरून माणूस ओळखण्यासाठी केला जातो. अर्थात याचे आणखी विस्तृत स्वरूप म्हणजे एखाद्या चित्रामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू आहेत किंवा सजीव/प्राणी/पक्षी आहेत अशा प्रकारच्या गोष्टी ओळखण्याचे असते. त्यामधला एक विशिष्ट प्रकार म्हणजे चित्रात दिसत असलेली प्रतिमा म्हणजे माणूस एवढे सांगून न थांबता त्यापुढे जाऊन तो माणूस नेमका कोण आहे, हे सांगणे. याला ‘फेशियल रेकग्निशन’ असे म्हणतात. यासाठी चित्रामधल्या माणसाच्या चेहरापट्टीमधल्या अनेक बारीकसारीक तपशिलांचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अभ्यास केला जातो. आधीपासून उपलब्ध असलेले नमुने आणि चित्रामधले तपशील यांची जुळणी करून त्यानुसार माणसाची नेमकी ओळख ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतींनी भरलेले हे काम करण्यासाठी संगणकांची क्षमता मोठ्या प्रमाणावर पणाला लावावी लागते. विमानात प्रवासी चढत असताना त्यांची नेमकी ओळख पटवणे, कार्यालयांमध्ये कर्मचारी कामाच्या ठिकाणी आल्यावर त्यांची आपोआप हजेरी घेणे, चित्रांमधून किंवा चित्रफितींमधून लोकांना नेमके ओळखणे, रस्त्यांवर अपघात झाल्यावर किंवा गुन्ह्यांच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही किंवा इतर चित्रांचे पुरावे यांच्या आधारे संबंधितांची ओळख पटवणे या सगळ्या कामांमध्ये हे तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. आता तर आपला मोबाइल फोन किंवा लॅपटॉपसुद्धा आपला चेहरा बघून आपणच आपले उपकरण वापरत आहोत ना, याची खात्री करून घेऊ शकतो!

हेही वाचा >>> कुतूहल: ढगफुटीचा अंदाज

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी

हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात वापरले जाण्याचे तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात या तंत्रज्ञानाला आपण एखादे चित्र दाखवले तर मुळात त्यामध्ये एक किंवा अनेक माणसांचे चेहरे आहेत हे त्याला आधी ओळखावे लागते. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेमधल्या ‘कम्प्युटर व्हिजन’ या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. महत्त्वाचे म्हणजे हे करत असताना सगळे चेहरे अगदी समोरूनच दिसत असले पाहिजेत, असे नाही. बाजूने दिसत असलेले चेहरेसुद्धा मानवीच आहेत हे ओळखण्याची क्षमता या तंत्रज्ञानात असते. दुसऱ्या टप्प्यात ‘फेशियल रेकग्निशन’चे तंत्रज्ञान हे चेहरे नेमके कुणाचे आहेत हे ठरवण्याचे काम करते. यासाठी चेहऱ्यांची लांबी, रुंदी, आकार, त्यामधले बारकावे यांची भौतिक मोजमाप करणे, चेहऱ्यावरचे हावभाव तपासणे या गोष्टी केल्या जातात. यासाठी दोन डोळ्यांमधले, कपाळ ते हनुवटी यामधले, नाक आणि जबडा यामधले अशी अंतरे मोजली जातात. डोळ्यांची खोली तपासली जाते. गालांच्या हाडांचा आकार विचारात घेतला जातो. ओठ, कान, हनुवटी यांचे बारकावे अभ्यासले जातात. शेवटच्या टप्प्यात वरील गोष्टींच्या मदतीने माणसाची नेमकी ओळख पटवली जाते.

अतुल कहाते

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader