खेळाडू निवडण्यासाठी आणि आपल्या संघात भरती करण्यासाठी जे तंत्र आपण पाहिले तेच तंत्र आपल्या टीममधील खेळाडूंच्या खेळाचे निरीक्षण करण्यासाठी वापरता येते. खेळताना खेळाडूच्या हालचाली कशा होत आहेत, त्याच्यावर किती ताण पडतो आहे, खेळाडूची शैली कशी आहे, खेळाडू खेळताना स्वत:ला दुखापत करून घेण्याची कितपत शक्यता आहे, तो खेळताना कशा प्रकारचे डावपेच वापरतो अशा सर्व गोष्टी खेळाडूच्या खेळाच्या व्हिडीओ चित्रणाचे विश्लेषण करून जाणून घेता येतात. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता सर्रास होत आहे. व्हिडीओ यंत्रणेप्रमाणेच कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा बसवलेली आणि परिधान करण्यायोग्य स्वास्थ्य मागोवा यंत्रणाही (फिटनेस ट्रॅकर) आता या कामासाठी वापरली जाते.

या विश्लेषणानुसार योग्य ते प्रशिक्षण खेळाडूला देऊन त्याच्यामधील दोष कमी करता येतात. तसेच त्याचा खेळ सुधारण्यासाठी किंवा त्याची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी काय प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे हे या विश्लेषणावरून कळते आणि त्यानुसार खेळाडूच्या प्रशिक्षणामध्ये योग्य ते बदल करता येतात. प्रत्येक खेळाडूसाठी त्याला सुयोग्य असा प्रशिक्षण कार्यक्रम आखता येतो आणि अंतिमत: संघाचा खेळ उत्कृष्ट होण्यासाठी मदत होते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

कृत्रिम बुद्धिमत्तेचे हेच तंत्र आणखी एका महत्त्वाच्या कामासाठी वापरले जाते. ते म्हणजे प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाचे आणि त्यातील खेळाडूंच्या खेळाचे विश्लेषण. यामध्ये प्रतिस्पर्धी संघाने कोणत्या क्षणी कोणते डावपेच वापरले, एखाद्या निर्णायक क्षणी नेमक्या कोणत्या चालीने बाजी पलटविली गेली हे शोधून काढले जाते. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू एकमेकांशी कसे संदेशवहन करतात, समन्वय कसा साधतात याचे विश्लेषण केले जाते. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची बलस्थाने आणि कमजोर जागा शोधल्या जातात. या सर्वांचा उपयोग करून आपल्या संघाची रचना कशी असावी, संघाने चाली कशा रचाव्यात, कोणते डावपेच वापरावेत इत्यादी गोष्टी ठरवल्या जातात. अशी सर्व व्यूहरचना केल्यानंतर विजयश्री मिळण्याची शक्यता खूपच वाढते. त्यामुळेच आज विविध खेळांमध्ये सर्व मातब्बर खेळाडू आणि संघ कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतात.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता खेळासंबंधी भाकिते करण्यासाठीही केला जातो. क्रिकेटचे उदाहरण घ्यायचे तर क्रिकेटचे मैदान कसे आहे, पिच म्हणजे खेळपट्टी कशी बनवली आहे, हवामान, दोन्ही संघातील खेळाडू इत्यादी माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अॅपला पुरवली की अॅप किती धावसंख्या होईल, मॅचचा निर्णय काय लागण्याची शक्यता आहे याचे भाकीत करते. या भाकिताचा उपयोग करून टीमचा व्यवस्थापक आपल्या टीमचे डावपेच आखू शकतो.

Story img Loader