प्रत्येक व्यक्ती कळत-नकळतपणे आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आणि घटना सतत बघून आपले मत तयार करत असते. तिची बुद्धी त्याप्रमाणे तिच्यात एक प्रकारची स्वजाणीव निर्माण करते. तिचा उपयोग समस्येकडे पाहण्याचा व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन विकसित होण्यात होतो जसा की, सकारात्मक, नकारात्मक किंवा तटस्थ. तरी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये असा सर्वव्यापी गुणधर्म तयार करणे हा तिच्या विकसनाचा अतिशय कठीण असा चौथा घटक आहे.

मनुष्य या संदर्भात स्वत:च्या सर्व ज्ञानेंद्रियांचा खुबीने उपयोग करतो. तसाच प्रयत्न कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत टप्प्याटप्प्यांत करावा, असे धोरण स्वीकारले गेले आहे. यातील प्रगतीचे उत्तम उदाहरण म्हणजे रस्त्यावरील चालकविरहित मोटारी. रस्त्यावरील अन्य वाहतूक, पादचारी, वाहतूक नियंत्रण यंत्रणा व नियम, रस्त्याची परिस्थिती आणि हवामान अशा विविध गोष्टींचा सतत मागोवा घेऊन सुरक्षितपणे मार्ग आक्रमित करणे, ही या घटकाच्या प्रगतीची पावती आहे.

Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…

हेही वाचा >>> कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया : संगणक आज्ञावली

पाचवा मूलभूत घटक आहे भाषा समजणे व हाताळणे. संगणक वापरासाठी त्याला समजेल अशी चिन्हे व तार्किक पाया असलेल्या भाषा तयार करण्यावर भर दिला गेला, कारण त्याची तांत्रिक जडणघडण आपल्या नैसर्गिक भाषा समजून घेण्यास असमर्थ असते. तसेच आपल्या सूचना व आज्ञावली टंकलेखनाने सहसा द्याव्या लागतात. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये मानवी भाषा समजून त्यांना प्रतिसाद देणे, भाषांतर करणे आणि नव्या साहित्यकृती निर्माण करणे यावर मागील सात दशकांत विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे. त्याच्या पुढे जाऊन यंत्राने मौखिक सूचना समजून कृती करणे हेदेखील काही प्रमाणात साध्य झाले आहे. यासाठी यंत्राला खास प्रशिक्षण देणे आवश्यक असते कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वर आणि बोलण्याची शैली वेगळी असते.

जरी भाषांतर नेहमी १०० टक्के बरोबर होत नसले तरी, ते समाधानकारक असण्यापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेची मजल पोहोचली आहे. मुख्य म्हणजे खासगी कंपन्यांनी तयार केलेल्या ‘सिरी’ आणि ‘ॲलेक्सा’ अशासारख्या अनेक प्रणाली ‘बुद्धिमान साहाय्यक’ अशा स्वरूपात उपलब्ध झाल्या असून त्या मौखिक आज्ञाही पाळतात. त्याच्या पुढे जाऊन काही प्रणाली मागील अनुभवांवरून अंदाज बांधून पर्यायदेखील सुचवतात किंवा मानवी सूचनांची वाट न बघता मर्यादित प्रमाणात आगाऊ कृती करतात. या मालिकेत चर्चा केलेल्या पाच प्राथमिक घटकांच्या विकासावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा मनोरा स्थापित झाला असून तो अधिक उंची गाठत आहे.

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल: office@mavipa.org संकेतस्थळ: http://www.mavipa.org