चंद्रावर गेलेल्या शेवटच्या मोहिमेतले, प्रत्यक्ष चांद्रभूमीवर पाऊल ठेवलेले एक चांद्रवीर वैज्ञानिक आहेत. त्यांचे नाव आहे हॅरिसन श्मिट आणि त्यांचा विषय आहे भूविज्ञान. हॅरिसन श्मिट यांचा जन्म न्यू मेक्सिको येथे ३ जुलै १९३५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्था (कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), ओस्लो विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठ येथे झाले. नॉर्वेमधल्या एक्लोगाइट नावाच्या खडकांचा पाषाणविज्ञान (पेट्रॉलॉजी) आणि सांरचनिकी (स्ट्रक्चरल जिऑलॉजी) या शाखांच्या दृष्टिकोनांतून अभ्यास करून १९६४ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून श्मिट यांनी भूविज्ञान विषयात डॉक्टरेट (पीएच.डी.) प्राप्त केली. श्मिट हे चंद्रावर जाणारी बारावी व्यक्ती होत. चंद्रावर जाणारे ते केवळ पहिलेच नव्हे, तर एकुलते एक भूवैज्ञानिक आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा