भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण या विभागाची स्थापना १८५१ मध्ये झाली. पण त्याही आधी कंपनी सरकारच्या पदरी असणाऱ्या अनेक युरोपीय अधिकाऱ्यांनी येथील निसर्गाचा अभ्यास केवळ आवड म्हणून सुरू केला होता. त्यातल्या काही जणांना खडक, खनिजे आणि जीवाश्म यांच्या अभ्यासात विशेष स्वारस्य होते. अशा अधिकाऱ्यांपैकी एक होते कॅप्टन स्लीमॅन.

१८२८ मध्ये त्यांना जबलपूरजवळ आकाराने खूप मोठ्या असणाऱ्या सुट्या मणक्यांचे काही जीवाश्म मिळाले. त्या सुमारास डॉ. स्पिल्सबरी नावाचे जबलपूरचे सिव्हिल सर्जन जबलपूरच्या आसमंताचा अभ्यास उत्साहाने करत होते. स्लीमॅन यांनी आपल्याला मिळालेला हा छोटासा खजिना डॉ. स्पिल्सबरींकडे सुपूर्द केला. त्यांनी कोलकात्याचे व्यासंगी निसर्ग अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांच्याकडे तो पाठवला. त्यांनी ते मणके जीवाश्मच आहेत याची खातरजमा केली आणि स्लीमॅन यांच्याकडे ते परत पाठवले.

Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
zara dar pornhub video income
Zara Dar: PhD सोडून पॉर्नहब निवडलं; आता अभ्यासाचे व्हिडीओ टाकून कमावते अधिक पैसे; कोण आहे जारा डार?
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
Senior advocate Iqbal Chagla passes away
अन्वयार्थ : गोड बोलण्यापेक्षा, न्यायाचे बोला!
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’

पुढे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागाची स्थापना झाल्यानंतर त्या विभागाचे एक भूवैज्ञानिक हेन्री मेडलिकॉट मध्य प्रदेशातल्या काही भागांचे सर्वेक्षण करत असताना त्यांनाही १८७१ मध्ये जबलपूरजवळ हाडांचे जीवाश्म सापडले. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक टॉमस ओल्डहॅम यांनी ते जीवाश्म आणि स्लीमॅन यांना आधी मिळालेले जीवाश्म, सर्वेक्षण विभागाच्या अधिकृत संग्रहात जमा केले.

हेही वाचा >>> कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन

हावड्याजवळच्या शिबपूरच्या वनस्पतिवैज्ञानिक उद्यानाचे प्रमुख ह्यू फाल्कनर यांना जीवाश्मांविषयी सखोल माहिती होती. ओल्डहॅम यांनी ते जीवाश्म त्यांना दाखवले. त्यांनी ‘ते एका डायनोसॉरचे आहेत, त्यांच्यावर अधिक काम झाले पाहिजे’ असे सांगितले. पण नंतर आजारी पडल्याने ते मायदेशी गेले. १८६५ मध्ये त्यांचे निधन झाले. मग ओल्डहॅम यांनी त्या हाडांच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या प्रतिकृती बनवून ‘ब्रिटिश म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’च्या रिचर्ड लेडेकर यांच्याकडे पाठवून दिल्या.

लेडेकर यांनी हे एका अवाढव्य शाकाहारी डायनोसॉरचे अवशेष आहेत असा निर्वाळा दिला. त्या डायनोसॉरला त्यांनी ‘टायटॅनोसॉरस इंडिकस’ असे वैज्ञानिक नाव दिले. ‘टायटॅनोसॉरस’ हे प्रजातीचे नाव असून त्याचा अर्थ ‘मातब्बर सरडा’ असा आहे. ‘इंडिकस’ हे जातीचे नाव आहे. हे नाव हा डायनोसॉर भारतात आढळतो असे दर्शवते. पण ही गोष्ट इथे संपत नाही.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला असे लक्षात आले की, स्लीमॅन यांना सापडलेले जीवाश्म भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांच्या संग्रहातून गहाळ झाले आहेत. पण ‘सर्वेक्षणा’चे अधिकारी धनंजय मोहबे आणि शुभाशीष सेन यांच्या प्रयत्नांमुळे ते २५ एप्रिल २०१२ रोजी पुन्हा सापडले.

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader