अनेकदा वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर मोठा त्याग करून जगाच्या अर्थव्यवस्थेला आणि जागतिक व्यापाराला मोलाचा हातभार लावणाऱ्या नाविकांच्या सन्मानार्थ २५ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय नाविक दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘आंतरराष्ट्रीय सागरी संघटना’ (इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशन, आयएमओ) जगभरातील दर्यावर्दी देशांची सरकारे, नौवहन कंपन्या, या व्यवसायाशी संलग्न संस्था, जहाजमालक इत्यादी संबंधितांना हा दिवस अर्थपूर्ण रीतीने साजरा करण्याचे आवाहन करते. २०१० साली मनिला (फिलिपीन्स) येथे हा दिवस दरवर्षी साजरा करण्याचा प्रघात ठरावाद्वारे करण्यात आला आणि २०११ सालापासून तो दिवस नियमितपणे पाळण्यात येतो. संयुक्त राष्ट्रांतर्फे ‘जागतिक पातळीवर साजरे होणाऱ्या’ दिवसांच्या यादीत याचा समावेश करण्यात आला आहे.

सुरुवातीपासूनच हा दिवस समाजमाध्यमांद्वारे साजरा करण्याचे आवाहन आयएमओने केले आहे. या दिवशी सर्वसंबंधितांना फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम इ. समाजमाध्यमांमधून ‘थँक्स टू सीफेर्स’  हा संदेश देण्याची विनंती करण्यात येते आणि त्याशिवाय या पेशाविषयी काही प्रेरणादायी ब्लॉग किंवा चर्चा ‘लिंकड् इन’ आणि ‘यूटय़ूब’वरही पोस्ट केल्या जातात. या दिवशी जगाला, आपली निरंतर सेवा करणाऱ्या १५ लाख नाविकांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते.

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Kalgitura play selected at Bharangam International Festival in New Delhi
दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच

जगात मालाची जी काही वाहतूक होते, त्यापैकी ९० टक्के माल जहाजे वाहून नेतात. तेही, पर्यावरणाचे विशेष नुकसान न करता. या केवळ तांत्रिक माहितीशिवाय जनमानसात असलेली नाविकांची प्रतिमा वास्तविक असावी यासाठी रोजच्या जीवनात त्यांना खवळलेल्या समुद्रापासून चाचेगिरीपर्यंत कोणकोणत्या अव्हानांना तोंड द्यावे लागते, या सगळय़ा गोष्टींची जगाला माहिती मिळावी हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. या वर्षी ‘मारपोल’ (मरिन पोल्युशन प्रिव्हेन्शन कन्व्हेन्शन) या नियमावलीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त ‘सागरी पर्यावरण सुरक्षेमध्ये नाविकांचे योगदान’ या विषयाकडे जगाचे लक्ष वेधणे, ‘पर्यावरणाशी आमची बांधिलकी कायम राहील’ असा विश्वास जनमानसात दृढ करणे हा या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय नाविक दिनाचा कार्यक्रम आहे.

– कॅप्टन सुनील सुळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

Story img Loader