भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ‘केंद्रीय निमखाऱ्या पाण्यातील जलजीव संवर्धन संस्था (सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रॅकिशवॉटर अ‍ॅक्वाकल्चर) ही संस्था निमखाऱ्या पाण्यातील व्यापारी मूल्य असणाऱ्या जीवांच्या संवर्धनाचे तंत्रज्ञान विकसित करते. १ एप्रिल १९८७ रोजी स्थापना झालेल्या या संस्थेचे मुख्य कार्यालय चेन्नई येथे असून त्यांच्या प्रयोगशाळा पश्चिम बंगालमधील काकद्वीप व तमिळनाडूत मुत्तुकाडूमध्ये आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य प्रजाती, तसेच कोळंबी, शेवंडे, कालवं, शिणाणे अशांना देशात आणि विदेशात बरीच मागणी असते. त्यामुळे अशा जलजीवांची शेती करण्यासाठी या संस्थेद्वारा मच्छीमार समाजाला आणि विशेषत: महिलांना प्रशिक्षण दिले जाते. मत्स्यशेतीचे तंत्रज्ञान संशोधनातून विकसित करणे, निरनिराळे अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थाना मत्स्यसंवर्धनाचे प्रशिक्षण देणे, मुत्तुकाडूच्या प्रयोगशाळेत मत्स्यबीज पैदास करण्याचे शिक्षण देणे, मत्स्यशेतीच्या प्रसारासाठी विस्तार कक्षामार्फत जनतेला, मत्स्यशेतीविषयक सल्ले आणि मार्गदर्शन देणे, मृदा आणि जल यांचे नमुने तपासण्याची व्यवस्था ठेवणे, अशी अनेक कामे संस्था अविरत करते.

या संस्थेत कवचधारी संधिपाद प्राण्यांचे संवर्धन आणि मत्स्यसंवर्धन असे दोन महत्त्वाचे विभाग आहेत. संधिपाद प्राण्यांची परिपक्वता आणि बीजनिर्मिती, नर्सरीतले संगोपन आणि संवर्धन, शेततलावाचा विकास, प्रजातींची नेमकी ओळख पटवण्यासाठी तसेच रोगनिदानाकरिता रेण्वीय उपाय यासोबत जिताडे, खजुरा, बोयटी, किंग मासा, मिल्क फिश अशा प्रजातींसाठी पालन, प्रजनन, त्यांच्यापासून बीज मिळवणे, त्यांचे परिपक्वतेपर्यंत संगोपन करणे इत्यादी व्यवस्थापनाच्या बाबी हे विभाग पाहतात. याशिवाय पोषण, जनुकशास्त्र, जैव तंत्रज्ञान, जलीय प्राण्यांचे आरोग्य आणि पर्यावरण असेही विभाग कार्यरत आहेत.

सागरी जीवांना वाढीच्या काळात लागणारे खाद्य तयार करणे, फिश मिल आणि माशाच्या तेलाला पूरक असे पदार्थ तयार करणे तसेच माशांच्या निरनिराळय़ा प्रजातींचे जनुकशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान यावर सखोल संशोधन केले जाते. मत्स्यशेतीवर येणारे साथीच्या रोगांचे संकट तसेच मत्स्यशेतीचा पर्यावरणावर होणारा  प्रभाव तपासणे हे काम पर्यावरण विभाग करतो. कोळंबीवर रोग आल्यास अपरिमित आर्थिक हानी होते, हे टाळण्यासाठी संशोधन केले जाते. स्थानिक मत्स्यशेती पद्धतींच्या अभ्यासासाठी काकद्वीप येथे प्रयोग केले जातात.

डॉ. नंदिनी विनय देशमुख ,मराठी विज्ञान परिषद