चेन्नई येथील ‘राष्ट्रीय तटीय संशोधन केंद्र’ (नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च – एनसीसीआर) पृथ्वी-विज्ञान मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असून भारतातील समुद्रकिनाऱ्यांबाबत सक्रिय आहे. येथे समुद्रकिनाऱ्यांच्या समस्यांवर उपाय योजून समुद्रामुळे मिळणारा लाभ वाढविता यावा, म्हणून तज्ज्ञांत समन्वय साधला जातो. त्यासंदर्भातील प्रशिक्षणही दिले जाते. एनसीसीआरने एर्नाकुलममध्ये टेट्रापॉड पुरविल्याने लाटांचे तडाखे सौम्य झाले असून समुद्रकिनाऱ्याची झीज मर्यादित राहिली आहे.

एनसीसीआर समुद्रातील पाणी, किनाऱ्यांवरील वाळूतील जीव यांचे पृथक्करण करते. किनाऱ्यांशी संबंधित समस्यांवरील उपायांच्या यशाचे मूल्यमापनही करते. २००४च्या त्सुनामीनंतर एनसीसीआरने भविष्यातील त्सुनामींची शक्यता, संभाव्य जागा, याबद्दल अभ्यासपूर्ण अहवाल दिला. भारतीय उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीनुसार १९९०-२०१६ दरम्यान भारतातील समुद्रतटांत कोणते नैसर्गिक आणि मानवनिर्मित बदल घडले याचा अहवाल तयार केला.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
parks in navi mumbai city in worse condition
उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Wildfire at foot of Sula mountain Environmentalists and farmers control on fire
सुळा डोंगर पायथ्याला वणवा; पर्यावरणमित्र, शेतकऱ्यांकडून नियंत्रण
kalyan session and district court verdict on mandir masjid issue at durgadi fort
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…

आपल्यासमोरील महासमस्या म्हणजे समुद्रात आणि समुद्रकिनाऱ्यांवर येणारा कचरा! २०१८-२०२१ दरम्यान तिमाही पाहणीत एनसीसीआरला आढळले की यातील ५० टक्के कचरा हा केवळ एकदा वापरलेले प्लास्टिक आहे. प्लास्टिक कचऱ्याच्या उदाहरणातून एनसीसीआरसमोरचे काम केवढे कठीण आहे हे कळते. मानवजात प्लास्टिकच्या नवनव्या वस्तू प्रचंड प्रमाणात बनवणे, खरेदी करणे आणि त्या फेकून नव्या घेणे या चक्रात अडकली आहे. मॅक्रो-मेसो-मायक्रो-नॅनोप्लास्टिक असे कणांच्या आकारानुसार प्लास्टिक-तुकडय़ांचे गट पडतात. प्लास्टिक-कचरा कुजत नाही, साचतो. त्यातील मोठय़ा तुकडय़ांचे छोटे कण होतात. त्यांचा पृष्ठभाग मोठा म्हणून विषारी पदार्थ शोषण्याची क्षमताही जास्त. असे सूक्ष्म कण अन्न-पाण्यातून आपल्यासह सर्व जीवांच्या शरीरात शिरत आहेत. त्यांचे दुष्परिणाम लवकरच दिसू लागतील.   

प्लास्टिकनिर्मितीत घट, वापरावर निर्बंध आणणे, जाणीवजागृतीने पुनर्वापर करणे, स्वयंसेवकांच्या मदतीने किनारे स्वच्छ ठेवणे, असे उपाय अपुरे पडत आहेत. जगभर एनसीसीआरसारख्या संस्थांना बळ मिळाले नाही तर लवकरच समुद्रांतील प्लास्टिकचे प्रमाण माशांपेक्षाही वाढेल. प्लास्टिकने पोटे फुगून जलचरांची भूक मरेल. अन्नाअभावी प्राणी मरतील. कासवांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण करणे, कांदळवनांचे मन्नारच्या आखातात आणि अन्यत्र असलेल्या प्रवाळिभतींचे, प्रवाळबेटांचे रक्षण व पुनस्र्थापना करणे यासाठी एनसीसीआर तंत्रे-साधने २० वर्षे विकसित करत आहे. मँगेनीजसारखी पोषक द्रव्ये अतिप्रमाणात पाण्यात येऊन शैवालांची अतिरिक्त वाढ होऊन पाण्यातील ऑक्सिजन घटणे, जीवजाती मरणे हीदेखील मोठी समस्या ठरत आहे.

– नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

Story img Loader