कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये अल्गोरिदम्सच्या विकसनासाठी निसर्ग प्रेरणादायी ठरला आहे. पृष्ठवंशीय प्राण्यांमधील रोगप्रतिकारक प्रणाली ‘स्व’ (उपयुक्त जिवाणू) आणि ‘उपरे’ (विषाणू आणि इतर आक्रमणकर्ते) यांच्यामधील फरक उत्तम प्रकारे ओळखून त्यानुसार प्रतिसाद देते; भविष्यात जलदपणे प्रतिसाद देण्यासाठी भूतकाळातील धोक्यांची स्मृतीदेखील ती राखते. या वैशिष्ट्यांवर ‘कृत्रिम रोगप्रतिकारक प्रणाली’ (आर्टिफिशियल इम्युन सिस्टम)’ आधारित आहे. हिचा उपयोग विसंगती व सायबर हल्ले ओळखून त्यांना त्वरित प्रतिसाद देणे, इष्टतमीकरण समस्या सोडविणे यांसारख्या कामांमध्ये होतो.

मिळालेली माहिती जरी संदिग्ध असली तरी मानवी तर्क वास्तवात अनेकदा उपयुक्त ठरतो, या संकल्पनेवर ‘अस्पष्ट तर्क’ पद्धत आधारलेली आहे. अनिश्चितता आणि अस्पष्टता असणाऱ्या समस्या हाताळण्यासाठी व त्यांचे नियंत्रण करण्यासाठी हिचा उपयोग होतो, उदाहरणार्थ, कॅमेरा, वॉशिंग मशीन आणि वातानुकूलन यंत्र अशा गॅजेटचे कार्य व नियंत्रण.

positive artificial intelligence
कुतूहल : भारताला गरज सकारात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेची!
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
Loksatta kutuhal The journey of artificial intelligence in India
कुतूहल: भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल
artificial intelligence helping tackle environmental challenges
कुतूहल :  कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी निसर्गाची जोड
Role of AI in marine Environmental Protection
कुतूहल : सागरी पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
A review of artificial intelligence in marine science
कुतूहल : समुद्रविज्ञान अभ्यासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Loksatta kutuhal Artificial Intelligence and Law
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कायदा

हेही वाचा >>> कुतूहल :  कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी निसर्गाची जोड

धातूशास्त्रातील ‘अनुशीतन’ प्रक्रियेमध्ये धातूला उष्णता देऊन हळूहळू थंड केले जाते. हे नियंत्रित शीतकरण धातूमधील मुक्त ऊर्जा कमी कमी करून त्याच्या अणूरचनेला स्थिर संरचनेपर्यंत पोहोचविते, ज्यामुळे अंतिमत: धातू इष्टतम स्थितीत स्थिर होतो; या संकल्पनेवर ‘सिम्युलेटेड अॅनिलिंग’ अल्गोरिदम आधारलेला आहे. संसाधनांचा कार्यक्षमपणे वापर कसा करावा, या प्रकारच्या समस्यांमध्ये इष्टतम उत्तर शोधण्यासाठी याची मदत होते.

मधमाश्यांच्या मध गोळा करण्याच्या प्रक्रियेवरून ‘मधमाशी अल्गोरिदम’ प्रेरणा घेतो. मधमाश्या भरपूर प्रमाणात असलेला मधाचा स्रोत शोधतात, आणि जेव्हा तो सापडतो, तेव्हा त्या परत फिरतात आणि पोळ्याच्या द्वारावर विशिष्ट प्रकारचे नृत्य करतात, ज्यामुळे इतर मधमाश्यांना अन्नाचे स्थान व त्याचा दर्जा कळतो. जे अन्नस्रोत अधिक आकर्षक असतात त्यांच्याकडे जास्त प्रमाणात मधमाश्या आकर्षित होतात तर कमी आकर्षक स्रोतांकडे दुर्लक्ष केले जाते. अभियांत्रिकी, वित्त, इत्यादी क्षेत्रांतील ‘समचयात्मक (कॉम्बिनेटोरिअल)’ इष्टतमीकरण समस्या सोडविणे, समान वैशिष्ट्ये असलेल्या घटकांचे पुंजकरण (क्लस्टरिंग) यांसारख्या कामामध्ये मधमाशी अल्गोरिदम उपयुक्त आहे

कल्पकतेने आणि नावीन्याने अचंबित करणाऱ्या अगणित संकल्पना निसर्गात आढळतात. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आतापर्यंत मर्यादित प्रमाणात यांचा उपयोग करण्यात आला आहे. भविष्यात, निसर्गप्रेरित अनेक नवलाईपूर्ण आणि कार्यक्षम पद्धती विकसित होतील आणि त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अधिक समृद्ध आणि सुरक्षित होईल अशी अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो.

डॉ. संजीव तांबे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader