सागरी पाण्यात कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन व ऑक्सिजन हे वायू जास्त प्रमाणात तर मिथेन, हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाइड, नायट्रस ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड हे ‘ट्रेस गॅसेस’  खूप कमी प्रमाणात आढळतात. याशिवाय हेलिअम, अरगॉन, क्रिप्टॉन, निऑन, झेनॉन हे नगण्य प्रमाणात व निष्क्रिय अवस्थेत आढळतात.         

वाऱ्यांच्या वहनाने निर्माण होणाऱ्या लाटांमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन व ऑक्सिजन हे वायू पाण्यात मिसळले जातात. सागरी वनस्पती प्रकाशसंश्लेषणात कार्बन डायऑक्साइडचा तर सागरी प्राणी श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. सागरी वनस्पती व प्राणी यांच्यात कार्बन डायऑक्साइड व ऑक्सिजन वायूंची चक्रीय देवाणघेवाण होते. सागरी सजीवांच्या जैविक क्रियेद्वारे वा मृत शरीरांच्या विघटनाद्वारेदेखील असंख्य घटकपदार्थ सागरात मिसळले जातात. या घटकांची समुद्राच्या पाण्यासोबत अभिक्रिया होऊन निरनिराळे वायू तयार होतात. नायट्रोजन रासायनिकदृष्टय़ा निष्क्रिय म्हणून त्याचा पाण्यातील स्थैर्यताकाल जास्त असतो. त्यामुळे सागरी पाण्यात त्याचे प्रमाण मुबलक असते. त्या तुलनेत ऑक्सिजनची जलविद्राव्यता दुप्पट असूनही त्याचे सागरी सजीवांद्वारे शोषण अधिक केले जाते म्हणून त्याचे प्रमाण कमी असते. मिथेनची विद्राव्यता खूप कमी असूनही त्याचा वापर सागरी सजीवांद्वारे फारसा न झाल्यामुळे तो समुद्रतळी सेंद्रिय द्रव्यांसोबत गाळात साठलेल्या अवस्थेत राहतो. अतिथंड पाण्यात मिथेन व कार्बन डायऑक्साइड यांच्या मिश्रणातून ‘मिथेन हायड्रेट’ नामक विशिष्ट बर्फ तयार होतो. कार्बन डायऑक्साइडची विद्राव्यता जास्त असून पाण्याशी संयोगानंतर काबरेनिक आम्ल तयार होते. विद्राव्य स्थितीत काबरेनिक आम्लाचे हायड्रोजन व बायकाबरेनेटमध्ये आयनीभवन होते. यातील बायकाबरेनेटचा वापर सागरी प्राणी बा व अंत: कंकालासाठी करतात.  सल्फर डायऑक्साइडची जलविद्राव्यता जास्त असूनही, त्याची पाण्याशी जलद अभिक्रिया घडून सल्फ्युरिक आम्ल तयार होते. सल्फ्युरिक आम्लयुक्त सागरीजलाचे बाष्पीभवन केल्यावर कॅल्शियम, मॅग्नेशियम, मँगेनिजसोबत संयोग घडून जिप्सम, अनहायड्रेट, इप्समसारखे खनिजयुक्त क्षार मिळविता येतात. सागरी सजीवांची विविधता व विपुलता, सागरीजलाचे तापमान, क्षारता, सामू मूल्य, विविध संयुगांच्या अभिक्रियेची गती, ध्रुवापासूनचे अंतर, पाण्याची खोली व दाब अशा पाण्यासंबंधी असंख्य घटकांवर या वायूंचे प्रमाण अवलंबून असते. कमी क्षारतेच्या थंड पाण्याची वायूधारण क्षमता अधिक असते. तापमान वाढल्यास  सागरी पाण्यातील वायूंची विद्राव्यता कमी होते. अतिखोल ठिकाणी दाब जास्त असल्याने ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असते.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two months ago Thane Municipal Corporation requested bmc for 50 million liters of water
ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
Pune Water Supply, Water Resources Department,
पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !

– डॉ. वंदना मुंडासे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader