सागरी पाण्यात कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन व ऑक्सिजन हे वायू जास्त प्रमाणात तर मिथेन, हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाइड, नायट्रस ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड हे ‘ट्रेस गॅसेस’ खूप कमी प्रमाणात आढळतात. याशिवाय हेलिअम, अरगॉन, क्रिप्टॉन, निऑन, झेनॉन हे नगण्य प्रमाणात व निष्क्रिय अवस्थेत आढळतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वाऱ्यांच्या वहनाने निर्माण होणाऱ्या लाटांमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन व ऑक्सिजन हे वायू पाण्यात मिसळले जातात. सागरी वनस्पती प्रकाशसंश्लेषणात कार्बन डायऑक्साइडचा तर सागरी प्राणी श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. सागरी वनस्पती व प्राणी यांच्यात कार्बन डायऑक्साइड व ऑक्सिजन वायूंची चक्रीय देवाणघेवाण होते. सागरी सजीवांच्या जैविक क्रियेद्वारे वा मृत शरीरांच्या विघटनाद्वारेदेखील असंख्य घटकपदार्थ सागरात मिसळले जातात. या घटकांची समुद्राच्या पाण्यासोबत अभिक्रिया होऊन निरनिराळे वायू तयार होतात. नायट्रोजन रासायनिकदृष्टय़ा निष्क्रिय म्हणून त्याचा पाण्यातील स्थैर्यताकाल जास्त असतो. त्यामुळे सागरी पाण्यात त्याचे प्रमाण मुबलक असते. त्या तुलनेत ऑक्सिजनची जलविद्राव्यता दुप्पट असूनही त्याचे सागरी सजीवांद्वारे शोषण अधिक केले जाते म्हणून त्याचे प्रमाण कमी असते. मिथेनची विद्राव्यता खूप कमी असूनही त्याचा वापर सागरी सजीवांद्वारे फारसा न झाल्यामुळे तो समुद्रतळी सेंद्रिय द्रव्यांसोबत गाळात साठलेल्या अवस्थेत राहतो. अतिथंड पाण्यात मिथेन व कार्बन डायऑक्साइड यांच्या मिश्रणातून ‘मिथेन हायड्रेट’ नामक विशिष्ट बर्फ तयार होतो. कार्बन डायऑक्साइडची विद्राव्यता जास्त असून पाण्याशी संयोगानंतर काबरेनिक आम्ल तयार होते. विद्राव्य स्थितीत काबरेनिक आम्लाचे हायड्रोजन व बायकाबरेनेटमध्ये आयनीभवन होते. यातील बायकाबरेनेटचा वापर सागरी प्राणी बा व अंत: कंकालासाठी करतात. सल्फर डायऑक्साइडची जलविद्राव्यता जास्त असूनही, त्याची पाण्याशी जलद अभिक्रिया घडून सल्फ्युरिक आम्ल तयार होते. सल्फ्युरिक आम्लयुक्त सागरीजलाचे बाष्पीभवन केल्यावर कॅल्शियम, मॅग्नेशियम, मँगेनिजसोबत संयोग घडून जिप्सम, अनहायड्रेट, इप्समसारखे खनिजयुक्त क्षार मिळविता येतात. सागरी सजीवांची विविधता व विपुलता, सागरीजलाचे तापमान, क्षारता, सामू मूल्य, विविध संयुगांच्या अभिक्रियेची गती, ध्रुवापासूनचे अंतर, पाण्याची खोली व दाब अशा पाण्यासंबंधी असंख्य घटकांवर या वायूंचे प्रमाण अवलंबून असते. कमी क्षारतेच्या थंड पाण्याची वायूधारण क्षमता अधिक असते. तापमान वाढल्यास सागरी पाण्यातील वायूंची विद्राव्यता कमी होते. अतिखोल ठिकाणी दाब जास्त असल्याने ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असते.
– डॉ. वंदना मुंडासे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org