रे सॉलोमोनॉफ हे एक अमेरिकी गणितज्ज्ञ होते. ते मशीन लर्निंग, अंदाज आणि संभाव्यता यावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शाखेचे प्रवर्तक होते. त्यांनी अल्गोरिदमिक संभाव्यता आणि प्रेरक अनुमानाचा वैश्विक सिद्धांत (युनिव्हर्सल इंडक्टिव्ह इन्फरन्स) यांचा शोध लावला.

रे सॉलोमोनॉफ यांचा जन्म २५ जुलै १९२६ रोजी क्लीव्हलँड, ओहायो येथे झाला. त्यांनी १९५१ मध्ये शिकागो विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एमएस ही पदवी प्राप्त केली. १९५० च्या दशकात सोलोमोनॉफ हे संभाव्य व्याकरण आणि संबंधित भाषा वापरणारे पहिले संशोधक होते. तेव्हा ‘संभाव्यता’ लोकप्रिय नसतानाही त्यांनी संभाव्य कृत्रिम बुद्धिमत्ता (प्रोबॅबिलिस्टिक एआय) वापरून मशीन लर्निंगचे प्रश्नसुद्धा हाताळले. त्यांनी १९५६ मध्ये नॉन-सेमेंटिक मशीन लर्निंगवरील पहिला अहवाल प्रसारित केला. याचवर्षी कृत्रिम बुद्धिमत्तेवर झालेल्या डार्टमाउथ समर रिसर्च कॉन्फरन्समध्ये सॉलोमोनॉफसह उपस्थित इतर शास्त्रज्ञांकडून प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेला विज्ञान म्हणून संबोधले गेले.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Image of Dr. Manmohan Singh
World On Manmohan Singh Death : “आर्थिक सुधारणांचे शिल्पकार ते अनुत्सुक पंतप्रधान”, मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जागतिक माध्यमांची प्रतिक्रिया
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

सॉलोमोनॉफ यांनी १९६० मध्ये प्रथमच अल्गोरिदमिक संभाव्यतेचे वर्णन केले आणि कोल्मोगोरोव्ह जटिलता (सर्वात लहान संगणक प्रोग्रामची लांबी) व अल्गोरिदमिक माहिती सिद्धांत सादर करणारे प्रमेय प्रकाशित केले.

सॉलोमोनॉफ यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची संभाव्यता आणि भविष्यवाणी यावर लक्ष केंद्रित करणारी एक शाखा विकसित केली. त्यांनी अल्गोरिदमिक संभाव्यता वितरणाद्वारे नियंत्रित यंत्राचे वर्णन केले. यांत्रिक बुद्धिमत्तेची उद्दिष्टे आणि अटींसह संभाव्यतेच्या या स्वरूपाचा वापर करून मशीन लर्निंग कसे विकसित करावे यावर त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. त्यांच्या अहवालांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे संभाव्य फायदे आणि जोखीम यावर चर्चा केली. पुढे त्यांनी या संभाव्यतेचा आणि सॉलोमोनॉफ इंडक्शनचा वापर प्रत्यक्ष अंदाज आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या समस्या सोडवण्यासाठी कसा करावा यावर भर दिला.

सॉलोमोनॉफ यांनी १९८५ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य उत्क्रांतीचे विश्लेषण केले. त्यांनी मानवी बुद्धिमत्तेपेक्षा कितीतरी पटीने जास्त बुद्धी असलेले यंत्र विकसित करण्यासाठी लागणारा खर्च आणि वेळ याचा अंदाज बांधला होता. त्यांनी याला ‘अनंत बिंदू’ म्हटले.

सॉलोमोनॉफ यांना २००३ मध्ये रॉयल होलोवे या लंडनमधील विद्यापीठातील कॉम्प्युटर लर्निंग रिसर्च सेंटरद्वारे दिल्या जाणाऱ्या ‘कोल्मोगोरोव्ह’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. रे सॉलोमोनॉफ यांचे ७ डिसेंबर २००९ रोजी, वयाच्या ८३व्या वर्षी, केंब्रिज, मॅसॅच्युसेट्स येथे निधन झाले.

– गौरी सागर देशपांडे,मराठी विज्ञान परिषद

Story img Loader