नारायणमूर्ती यांनी एक ‘‘शेअर ट्रेडिंग करणारी कंपनी’’ चालू केली आहे असं सांगणारी चित्रफीत समाजमाध्यमांवर अलीकडे फिरत होती. या चित्रफितीमुळे बऱ्याच लोकांनी त्या कंपनीत पैसे गुंतवले आणि ते फसले. शेवटी नारायणमूर्ती यांनी स्वत: एक पत्रकार परिषद घेऊन ती चित्रफीत खोटी म्हणजे ‘डीपफेक तंत्रज्ञान’ वापरून बनवली असल्याचं सांगितलं. नारायणमूर्ती यांची इतकी हुबेहूब चित्रफीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनवण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कृत्रिम बुद्धिमत्तेमधली अत्याधुनिक साधनं वापरून ‘डिजिटल अरेस्ट’ नावाचा एक नवा फसवणुकीचा प्रकार सध्या जन्माला आला आहे. एखाद्या व्यक्तीला, प्राप्तिकर अधिकारी किंवा अमली पदार्थांच्या तस्करीसंबंधित अधिकाऱ्याचा फोन आहे असं सांगितलं जातं. त्या व्यक्तीच्या बँकेच्या खात्यातून पैशांचे अवैध व्यवहार झाले आहेत, वगैरे प्रकारचं काहीतरी कारण सांगून व्हिडीओ कॉलद्वारे त्या व्यक्तीची कसून चौकशी होते. या व्हिडीओ कॉलमध्ये चौकशी करणारी व्यक्ती सरकारी कार्यालयात किंवा एखाद्या न्यायालयात बसली आहे असा आभास निर्माण केला जातो आणि त्या व्यक्तीला शिक्षा म्हणून लाखो रुपये भरण्यास भाग पाडले जाते. हा प्रकार एवढा गंभीर आहे की ‘मन की बात’मध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डिजिटल अरेस्ट’पासून लोकांनी सावध राहावं, असं आवाहन केलं.

समाजमाध्यमांमधला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हे एक दुधारी शस्त्र आहे. ही जोडी समाजाचं जेवढं चांगलं करू शकते तेवढंच वाईटही करू शकते. आपल्या संपूर्ण जीवनावर समाजमाध्यमांचा प्रभाव आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे हा प्रभाव अधिक गंभीर रूप धारण करू शकतो. आपण समाजमाध्यमांवर आपली गोपनीय माहिती कळतनकळत उघड करतो. त्या माहितीचं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने सखोल विश्लेषण करून ते इतरांना सहज उपलब्ध करून दिलं जातं. यामुळे आपल्या जीवनातली गोपनीयता कायमस्वरूपी नष्ट तर होतेच पण या माहितीचा वापर करून खोटी माहिती, खोट्या बातम्या परिणामकारकरीत्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. एखाद्या घटनेवरचं आपलं मत यामुळे आपण बदलतो. बऱ्याचदा आपल्यावर परस्परविरोधी मतांचा मारा होत राहतो. त्यामुळे आपला वैचारिक गोंधळ उडतो.

आज कृत्रिम बुद्धिमत्तेतली प्रगती काहीशी मर्यादित आहे तरीही याचा समाजमाध्यमांमधला वापर इतका धोकादायक ठरतो आहे, भविष्यात ही जोडी काय उत्पात घडवून आणेल, याचा साधा विचारही आज भयचकित करून सोडतो आहे.

डॉ. माधवी ठाकूरदेसाई