कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विविध अंगांनी जसजसा विस्तारत गेला आणि त्याचे उपयोजन मोठय़ा प्रमाणावर सर्वदूर होऊ लागले उदाहरणार्थ- उत्पादन, सेवा, कार्यालय आणि निवास क्षेत्रांत, तसे त्याचा मागोवा घेण्यासाठी त्याच्या विकासाच्या अवस्थांचे वर्गीकरण करणे अनिवार्य झाले. ढोबळमानाने सबळ (स्ट्राँग) आणि मर्यादित (नॅरो) कृत्रिम बुद्धिमत्ता असा मतभेद केला जातो. सबळ कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे प्रगत आज्ञावलीसंपन्न अशी प्रणाली, जी मानवी मेंदू करू शकत असलेल्या अधिकांश संज्ञानात्मक (कॉग्निटीव) गोष्टी जवळपास त्याच प्रमाणात करू शकण्यास समर्थ असेल. अशी प्रणाली अर्थातच टय़ुरिंगच्या चाचणीत उत्तीर्ण होणे अपेक्षित असते. मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे अशी प्रणाली जी केवळ विशिष्ट कामासाठी संरचित आणि प्रशिक्षित असेल. कारखान्यात जुळवणी साखळीवर (असेम्ब्ली लाइन) निर्देशित ठरावीक काम करणारे औद्योगिक यंत्रमानव हे तिचे एक उदाहरण आहे.

मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेचे अधिक औपचारिक वर्गीकरण दोन प्रकारे केले जाते. ते व्यापक असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सध्याच्या आणि आगामी कुठल्याही प्रणालीला वर्गीकृत करण्यास उपयुक्त ठरू शकते. त्यातील पहिले वर्गीकरण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेवर (कॅपेबिलिटी) आधारित आहे. त्याचे तीन प्रमुख उपविभाग आहेत. मर्यादित, व्यापक किंवा सर्वसाधारण (जनरल) आणि परिपूर्ण किंवा सर्वोत्तम (सुपर) कृत्रिम बुद्धिमत्ता असे हे वर्ग आहेत. एका अर्थाने ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाचे टप्पे पुढे आणतात. तंत्रज्ञानातील प्रगती, मुख्यत्वे स्मृतिमंजूषेची धारण आणि प्रक्रिया क्षमता त्याच्या मुळाशी आहे.

Objection notice submitted by consumer panchayat on housing policy regarding ownership of Zopu plot Mumbai news
झोपु भूखंडाची मालकी विकासकांना देण्यास विरोध! गृहनिर्माण धोरणावर ग्राहक पंचायतीकडून हरकती-सूचना सादर
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
2nd October Gandhi Jayanti Physical Mental Violence Religion
बदलतं जग आणि महात्मा
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
Loksatta pahili baju What is the next step of Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana
पहिली बाजू: आयुष्मान भारत : सर्वसमावेशक सेवेसाठी!
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
University of Mumbai, Artificial Intelligence Model,
कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलच्या विकासासाठी मुंबई विद्यापीठाची अनोखी झेप! आजारांचे आगाऊ निदान होणार…
Loksatta sarva karyeshu sarvada Review of 11 organizations working for society
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड

दुसरे वर्गीकरण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कार्यात्मक पद्धतीवर (फंक्शनॅलिटी) आधारित आहे. त्याचे चार प्रमुख उपविभाग आहेत. त्याप्रमाणे केवळ प्रतिसाद देऊन तो प्रसंग विसरून जाणारी प्रणाली, स्मृतिमंजूषेत अनुभव साठवून भविष्यात त्याचा वापर करणारी प्रणाली, सजीवाप्रमाणे भावना आणि विचार यांचा खल करून कृती करणारी प्रणाली, आणि त्यापुढे जाऊन स्वजाणीव असलेली सबोध (कॉन्शस) प्रणाली, असे कृत्रिम बुद्धिमत्तेचे चार वर्ग केले आहेत. त्यातील तिसरा आणि चौथा टप्पा गाठणाऱ्या प्रणाली सध्या अस्तित्वात नाहीत. तसे घडेल आहे का आणि असल्यास, केव्हा, याबाबत सध्या एकमत नाही. हे वर्गीकरण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाला दिशा देत आहे. आगामी लेखांत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वरील विविध वर्गाची चर्चा विस्ताराने केली जाईल.

डॉ. विवेक पाटकर,मराठी विज्ञान परिषद