माणसाच्या मेंदूसारखे हुबेहूब चालणारे यंत्र बनवायचे असेल तर त्या यंत्रात मानवी मेंदूच्या सगळ्या क्षमता असाव्या लागतील. मानवी बुद्धिमत्तेला अनेक पदर आहेत. माणसे नक्की कसा विचार करतात आणि कसा निर्णय घेतात हे अजूनही नीटसे कळलेले नाही. मानवी बुद्धिमत्तेमध्ये हुशारी (इंटेलिजन्स) बरोबरच जाणीवही (कॉन्शसनेस) अभिप्रेत आहे.

यामुळेच मानवी मेंदूसारखे हुबेहूब यंत्र बनवणे ही अतिशय अवघड आणि जटिल गोष्ट आहे. मेंदूमध्ये ज्या घडामोडी सुरू असतात, त्या मूर्त स्वरूपात (फिजिकल प्रोसेस) जाणून घेतल्या तर मानवी मेंदूसारखे यंत्र तयार करणे शक्य होईल. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की संश्लेषित बुद्धिमत्तेमध्ये ह्युमनॉइड बनवणे अभिप्रेत नसते, कारण ह्युमनॉइडससुद्धा कार्यक्रम भरलेल्या सॉफ्टवेअरवर चालतात. त्यांना प्रोग्रामिंगची गरज असते. संश्लेषित बुद्धिमत्तेमध्ये एखाद्या यंत्रामध्ये ‘मानवनिर्मित मेंदू’ बसवणे अभिप्रेत आहे. यामुळे ते यंत्र आपल्या आजूबाजूच्या परिसराशी संवाद साधू शकेल. आपण जसे स्वत:हूनच अशा प्रकारच्या संवादातून शिकतो, तसे हे यंत्र आपल्या आपणच (स्वत:च) शिकेल.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
how to use data science properly how to learn data science
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्स
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Animals have exceptional memory
विलक्षण स्मरणशक्ती असते ‘या’ प्राण्यांकडे! माणसालाही देऊ शकतात आव्हान
Brain rot Our brain is losing its ability to think
आपला मेंदू खरंच क्षमता गमावत चालला आहे का?
Information from District Collector Kumar Ashirwad that efforts are being made to start Solapur air service
सोलापूर विमानसेवेला लवकरच मुहूर्त; प्रशासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता

आपल्या मेंदूत न्यूरॉन्स असतात. दोन न्यूरॉन्समध्ये एक फट असते. तिला सिनॅप्स म्हणतात. न्यूरॉन्स सिनॅप्सद्वारे एकमेकांना जोडलेले असतात. सिनॅप्सच्या फटीतून ‘न्यूरोट्रान्समीटर रेणू’ एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे जातात. आपल्या मेंदूत साधारणपणे दहा हजार कोटी न्यूरॉन्स असतात आणि एक लाख कोटी सिनॅप्सेस असतात. त्यामुळे जर (संश्लेषित) कृत्रिम मेंदू तयार करायचा असेल तर त्याची सुरुवात न्यूरॉन्सपासून करावी लागेल. इथे कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगी पडते.

कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये ‘कृत्रिम न्युरल नेटवर्क्स’ असतात. या नेटवर्क्सचे भाषांतर करणे, चेहरा ओळखणे अशी कामे करता येतात. अलीकडे असे लक्षात आले आहे की काही अतिशय गुंतागुंतीच्या ‘कृत्रिम न्युरल नेटवर्क्स’ना काहीशी माणसांसारखी आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होऊ शकते. अशी कृत्रिम न्युरल नेटवर्क्स संश्लेषित बुद्धिमत्ता विकसित करताना वापरली जातील. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे संश्लेषित बुद्धिमत्ता साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल निश्चित पडलेले आहे.

संश्लेषित बुद्धिमत्तेचे अनेक फायदे आहेत. कृत्रिम (संश्लेषित) मेंदू मानवी मेंदूपेक्षा जास्त माहिती साठवू शकेल. त्याची स्मरणशक्ती मानवी मेंदूपेक्षा जास्त असेल. कृत्रिम मेंदूला, मानवी मेंदूसारखा विस्मरणाचा त्रास असणार नाही. या मेंदूची कल्पनाशक्ती, सर्जनशीलता कशी असेल? नैसर्गिक मानवी बुद्धिमत्तेला संश्लेषित बुद्धिमत्ता भारी पडेल का? या प्रश्नांची उत्तरे मात्र येणारा काळच देईल.

  • डॉ.माधवी ठाकूरदेसाई

Story img Loader