कोविडच्या भयंकर काळात विद्यार्थ्यांची परवड झाली, हे खरेच आहे. पण या काळात एक आभासी जग सर्वांच्या मदतीला आले. या जगाचे नाव आहे- समाजमाध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. समाजमाध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा संगम एक उत्तम शैक्षणिक साधन आहे. शिक्षणाच्या काही अभूतपूर्व संधी या आभासी विश्वाने निर्माण केल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
समाजमाध्यमांमुळे जगभरातले विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकांशी जोडले जाऊन संवाद साधू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हा संवाद अतिशय प्रभावी होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर डीआयवाय, शैक्षणिक ब्लॉग, डीजीसोशल, गुडरीड्स यांसारखी अनेक शैक्षणिक समाजमाध्यमे आज अतिशय लोकप्रिय झाली आहेत.
समाजमाध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांना अनेक प्रकाराने उपयोगी पडतात. समजा एखाद्या विद्यार्थ्याला क्वांटम कॉम्प्युटिंगसारख्या गहन विषयातली माहिती हवी आहे. जर त्या विद्यार्थ्याने ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’ हा शब्द गूगल या सर्च इंजिनवर आपला स्मार्ट फोन वापरून शोधला असेल तर लगेच त्या विद्यार्थ्याच्या फेसबुक किंवा इन्स्टाग्राम पेजवरही क्वांटम कॉम्प्युटिंग या विषयासंदर्भातली माहिती मिळू लागते. हा विषय जगभरात कुठे कुठे शिकवला जातो, त्या संस्थांचा दर्जा काय ही सगळी माहिती विद्यार्थ्याला मिळते. इतकेच नाही तर क्वांटम कॉम्प्युटिंग हा विषय शिकवणाऱ्या संस्थांनासुद्धा या विद्यार्थ्याची माहिती मिळते आणि त्या विद्यार्थ्याशी त्या संस्थाही जोडल्या जातात.
कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रगतीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार रोजगाराच्या संधीसुद्धा पटकन मिळू शकतात. ‘लिंक्ड इन’सारख्या समाजमाध्यमांमुळे आपल्याला कुठे रोजगार उपलब्ध आहे याची माहिती त्या विद्यार्थ्याला मिळत राहते. कृत्रिम बुद्धिमत्ता वेगवेगळ्या ‘की वर्ल्ड्स आणि फिल्टर्स’मुळे आपल्याला हवी ती माहिती नेमकेपणाने मिळवून देते. समाजमाध्यमांच्या वापराचे दुष्परिणामसुद्धा आहेतच. आजचा विद्यार्थी सतत कुठले तरी समाजमाध्यम वापरतच असतो. निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेची ताकद एवढी आहे की एखाद्या मुलाचा स्वभाव आणि वयोगट ओळखून तो कोणत्या प्रलोभनाला बळी पडू शकेल हे लगेच कळू शकते. यामुळे समाजमाध्यमे विद्यार्थ्यांना व्यसनाधीन बनवू शकतात. पौगंडावस्थेतल्या मुलांना ‘पोर्नोग्राफी’सारखी संकेतस्थळे दाखवून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करू शकतात. समाजमाध्यमे काळजीपूर्वक कशी वापरावीत आणि आपली माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेपासून कशी सुरक्षित ठेवावीत, याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना अगदी शालेय जीवनापासून देणे ही काळाची गरज आहे. नाहीतर हे आभासी विश्व भस्मासुर ठरेल.
माधवी ठाकूरदेसाई