दूरवरच्या देशांपर्यंत लंडन शहराचे महत्त्व वाढले ते साधारणत १७व्या शतकाच्या सुरुवातीला. इंग्लंडच्या राजवटीने आणि त्यांच्या पार्लमेंटने वसाहतवादाला सुरुवात केल्यापासून साधारणत विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे जवळजवळ ३५० वष्रे हे महत्त्व टिकून राहिले. एके काळी विस्ताराने, लोकसंख्येने व प्रतिष्ठेने लंडन जगात सर्वश्रेष्ठ समजले जाई.
गेल्या साठ ते सत्तर वर्षांमध्ये मात्र ही परिस्थिती बदलली आहे. असे असले तरी आजही अनेकांना लंडनची पार्लमेंट, लंडनचे पूल, लंडनचा इतिहास तिथले समाजजीवन याबद्दल सुप्त आकर्षण आहेच. कधीही सूर्य न मावळणाऱ्या साम्राज्याचे सूत्रधार शहर म्हणून लंडनची ख्याती होती. त्यामुळे अनेक देशांतील राजकारण्यांचा इथे राबता होता.
अगदी साठ-पासष्ट वर्षांपूर्वी दुसरे महायुद्ध संपेपर्यंत हिटलरी झंझावाताला तोंड देण्यासाठी जी युद्धनीती, डावपेच आखले गेले ते या लंडनमधूनच! या महायुद्धात जो विध्वंस, होरपळ झाली त्यात लंडनचा क्रमांक बराच वरचा लागेल. जगभर हिंडलेल्या पर्यटकाला आजही इंग्लंडच्या छोटय़ाशा बेटावरचे लंडन शहर पाहिल्याशिवाय जग पाहिल्यासारखे वाटत नाही. शेकडो वष्रे ‘साम्राज्याचा गाभा’ असलेल्या लंडनबद्दलचे सुप्त आकर्षण भारतीयांना तर वेगळेच आहे. बिटिश साम्राज्याच्या आधिपत्याचा आता मागमूसही शिल्लक नसला तरी लंडनवासियांच्या मातृभाषेचे – इंग्लिशचे -आधिपत्य जगावर नक्कीच आहे.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल : वनस्पतींच्या वर्गीकरणाचा इतिहास
nav02आज नक्की सांगता येत नाही की आपल्या पूर्वजांना वनस्पतीसंबंधी किती ज्ञान होते, पण एक नक्की की आपले पूर्वज अनुभवाने खाण्यायोग्य व अयोग्य असे अंतर करू शकत होते. त्यांनी विविध वनस्पतींमधील भेद ओळखण्याची भाषाही विकसित केली होती. लिहिण्याची आणि छपाईची कला अवगत झाल्यावर प्राग मनुष्यजातीचा संपूर्ण कायापालट झाला. (ख्रिस्तपूर्व ३७०-२८५) हे वनस्पती विज्ञानाचे पितामह म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्लॅटो आणि अ‍ॅरिस्टॉटल यांच्याकडे ग्रीसमध्ये वनस्पतींचे अध्ययन केले. थिओफ्रॅस्टसने अगदी साधेसोपे वर्गीकरण केले. रोपटे, झुडूप आणि वृक्ष त्याचप्रमाणे अपुष्प आणि सपुष्प वनस्पती असाही भेद केला. त्यांनी जवळजवळ ५०० वनस्पतींचे वर्गीकरण त्यांच्या पुस्तकात केले.
त्यानंतर प्लिनी (इस. सन २३-२९) आणि डाओस्कोरिउस (इस. सन ६२-१२८) या दोन रोमन वनस्पती अभ्यासकांनी त्यांचे काम पुढे नेले. भारतात पराशर नावाच्या ऋषींनी ‘वृक्षआयुर्वेद’ या पुस्तकात वनस्पतींचे वैज्ञानिकदृष्टय़ा वर्णन केल्याचे आढळते. असे म्हटले जाते की, पराशरांनी िभगही विकसित केले होते. त्याचा उपयोग वनस्पती निरीक्षणासाठी होत असे.
ख्रिस्ती कालखंडाच्या पहिल्या हजार वर्षांत वनस्पती वर्गीकरणाच्या क्षेत्रात फारसे काम झाल्याचा उल्लेख नाही, पण नंतर मध्ययुगीन काळात अल्बर्ट्स मॅगनस (१२००-१२८०) या प्रसिद्ध पावलेल्या अभ्यासकानी एकबीजपत्रीय वनस्पती आणि द्विबीजपत्रीय वनस्पती आणि संवहनी आणि असंवहनी वनस्पती या वनस्पती वेगळ्या असल्याचा खुलासा करून मांडले.
समुद्रभ्रमण करण्याच्या शोधाने अनेक दर्यावर्दी भ्रमंती करू लागले आणि या भटकंतीमुळे अनेक औषधी वनस्पतींची माहिती जमा झाली. १६०० वे शतक जर्मन अभ्यासकांनी गाजवले. ओटो ब्रुम्फेल्स जेरोम बोक आणि लियोन्हईकुक्स यांनी सुंदर चित्रांच्या मदतीने अनेक वनस्पतींची माहिती मांडली. पण कुठल्याही वर्गीकरण पद्धतीवर भर दिला नाही. फक्त चित्रांसह ग्रंथ प्रकाशित केले.
डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई) मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

2160 BEST buses scrapped in five years Mumbai print news
पाच वर्षांत बेस्टच्या २१६० बस भंगारात, केवळ ३७ नव्या बसची खरेदी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Navi Mumbai city is called the Flamingo City This year arrival of flamingo bired delayed
फ्लेमिंगोंच्या आगमनाची प्रतीक्षाच
delhi school bomb hoax
४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”
British Indians stripped of honours by the UK Crown
हिंदूंची बाजू घेतल्याने अन् मोदींचे समर्थन केल्याने किंग चार्ल्स यांनी दोन ब्रिटीश भारतीयांना दिलेला सन्मान परत घेतला; प्रकरण काय?
K North Division office, K North Division office inauguration, mumbai, K North Division office mumbai,
मुंबई : के उत्तर विभाग कार्यालय अद्याप सुरू नाही, निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत उद्घाटन
Mumbai Municipal Corporation K North Division office is not open yet Mumbai news
के उत्तर विभाग कार्यालय अद्याप सुरू नाही; निवडणूकीच्या तोंडावर घाईघाईत उदघाट्न
Story img Loader