गाई-म्हशींसाठी वैरण जास्त प्रमाणात उपलब्ध असल्यास प्रति दहा किलो वैरणीस एक किलो पशुखाद्य कमी देऊन खाद्य खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. दहा किलोपेक्षा कमी प्रमाणात हिरवी वैरण उपलब्ध असल्यास दूध उत्पादनानुसार दर्जेदार खनिज मिश्रण प्रतिदिनी ३० ते ४० ग्रॅम पशुखाद्यात मिसळून द्यावे.
आधुनिक तंत्रानुसार, बायपास प्रथिन, बायपास फॅट यांच्या वापराने खाद्य कमतरता टाळता येते. खर्चावर नियंत्रण ठेवता येते. याबाबत स्थानिक पशुवैद्याची मदत घ्यावी. निकस चाऱ्याचे (पेंढा, उसाचा वरचा पाला, कडबाकुट्टी, गहू सरमड) पोषममुल्य युरिया, मळी (उसाची), खनिज मिश्रण एकत्र करुन वाढवता येते. युरिया विषारी घटक असल्याने तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच ते वापरावे. मका, नेपीयरसारखी लांब दांडय़ाची वैरण कुट्टी करुन चाऱ्यासोबत दिल्यास चारा वाया जात नाही.
पाण्याचे महत्त्व : दुधात पाण्याचे प्रमाण नैसर्गिकरीत्या ८५ टक्के असते. दुभत्या गुरांना स्वच्छ पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध नसल्यास दूध उत्पादन कमी होते. उन्हाळ्यात थंड पाणी आणि हिवाळ्यात कोमट पाणी दिल्यास हवामानानुसार होणारी दूध उत्पादन घट टाळता येते. पाण्याच्या टाक्यांना दर १५ दिवसांनी चुनासफेदी केल्याने स्वच्छ पाणीपुरवठा होतो. गुरांना पिण्यासाठी पाणी सतत उपलब्ध असावे.
प्रजनन व्यवस्थापन : दूध व्यवसायात नुकसान होण्याचे प्रमुख कारण भाकड गुरांचा संगोपन खर्च हे आहे. नुकसान टाळण्याच्या दृष्टीने गाय दर १३ ते १४ महिन्यांनी आणि म्हैस दर १४ ते १५ महिन्यांनी वीत राहायला हवी. नियमितपणे गुरे विण्याकरिता त्यांना सकस खाद्य, चारा, खनिज मिश्रण द्यायला हवा. खाद्याअभावी दूध उत्पादन करत राहिल्यामुळे गुरे अशक्त होतात. परिणामी प्रजनन समस्या निर्माण होतात.
विल्यानंतर गर्भाशयाचे आरोग्य जिवाणूसंसर्गाने बिघडल्यास गुरे गाभण राहात नाहीत. अशावेळी तज्ज्ञ पशुवैद्याकडून उपचार करून घ्यायला हवेत. तीनपेक्षा जास्त वेळा रेतनक्रिया करूनही गुरे गाभण राहात नसतील, तर पशुवैद्याकडून त्वरित तपासणी करुन घ्यायला हवी. प्रतिजैविके औषधे आणि संप्रेरकांचा वापर करून गुरांची प्रजनन समस्या सोडवता येते. उपचार करूनही गाभण राहात नाहीत, अशी गुरे पुढील संगोपनास ठेवू नयेत.
कुतूहल – किफायतशीर दूध उत्पादन- २
गाई-म्हशींसाठी वैरण जास्त प्रमाणात उपलब्ध असल्यास प्रति दहा किलो वैरणीस एक किलो पशुखाद्य कमी देऊन खाद्य खर्चावर नियंत्रण ठेवता येईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lucrative milk production