भारतीय संस्कृती, महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान आणि कार्य यांच्यामुळे अनेक परकीय व्यक्ती प्रभावित झाल्या. त्यातील अनेकांनी आपल्या जीवनप्रवासाची दिशा बदलून स्वत:ला गांधीजींच्या कार्यात झोकून दिलं. त्यापकी एक आहेत जन्माने ब्रिटिश असलेल्या मेडेलीन स्लेड. त्या प्रामुख्याने ओळखल्या जातात ‘मीरा बहन’ या नावानं! गांधीजींच्या दोन ब्रिटिश मानसकन्यांपकी एक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेडेलीन एडमंड स्लेड यांचा जन्म इंग्लंडमधील सरे परगण्यातला- १८९२ सालचा. त्यांचे वडील सर एडमंड स्लेड हे ब्रिटिश रॉयल नेव्हीत रिअर अ‍ॅडमिरल या उच्चपदावरचे अधिकारी आणि प्रतिष्ठित, संपन्न घराण्यातले. मेडलीन आणि तिच्या भावंडांचं बालपण तिच्या आजोबांकडे, सरेमधील शेतातल्या घरात गेलं. बालपणापासून संगीताची आवड असलेली मेडेलीन, प्रसिद्ध संगीतकार लुडवीग व्हान बेथोवेन याच्या संगीताची चाहती होती. या काळात ती पियानोवादन शिकून अनेक संगीत समारोहांत आपली कला तिने सादर केली.

मेडेलीनच्या अशा सरळसोट चाललेल्या जीवनप्रवासाला एके दिवशी अनपेक्षितरीत्या कलाटणी मिळाली. ती तत्कालीन फ्रेंच लेखक, कादंबरीकार रोमेन रोलंड यांनी लिहिलेल्या महात्मा गांधी यांच्या चरित्रामुळे! हे पुस्तक मेडेलीनच्या वाचनात आलं. गांधीजींबद्दल ‘विसाव्या शतकातील सर्वाधिक महान व्यक्ती’ असं वर्णन वाचून, तसंच त्यांचं तत्त्वज्ञान, कार्य वाचून प्रभावित झालेल्या मेडेलीनने तडक लेखकामार्फत गांधीजींशी संपर्क साधला.  साबरमती आश्रमात राहून त्यांच्या कार्यात सहभागी होण्याचा आपला मानस मेडेलीनने त्यांना सांगून त्यासाठी त्यांची अनुमती मागितली. गांधीजींनी त्यावर आश्रमीय जीवन आणि त्याचे कार्य किती खडतर आहे याची तिला कल्पना देऊनही तिचा त्याबाबत निर्धार पक्का राहिला. १९२५ साली मेडेलीन भारतात साबरमती आश्रमात आली ती आपले आई-वडील, भावंडे आणि मायदेश सोडून भारतात ३४ वष्रे राहण्यासाठी. स्वत:च्या खासगी कामासाठी ती पुन्हा इंग्लंडमध्ये गेलीच नाही, अगदी वडिलांच्या निधनाची बातमी कळूनही!

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com