भारतीय ज्ञानपीठाचा १९८२ चा साहित्य पुरस्कार महादेवी वर्मा यांना ‘यामा’साठी तसेच १९७७ च्या पूर्वी प्रकाशित भारतीय भाषेतील सर्जनात्मक साहित्यात सर्वश्रेष्ठ साहित्यिक योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. काव्यातील मान्य संकेताच्या चौकटीत वावरणाऱ्या हिंदी कवितेला बंधनातून मुक्त करून नवनिर्मितीच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देणाऱ्या त्या हिंदीतील एक श्रेष्ठ कवयित्री होत्या.

प्राचीन साहित्याचा सखोल अभ्यास, भारतीय साहित्य आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासामुळे त्यांच्या काव्याला एक उत्तुंग परिमाण लाभलं आहे. मानवी मनाच्या अनेक भावावस्थांचं दर्शन घडविणारी महादेवींची काव्यरचना एवढंच काय, पण त्यांचं गद्यलेखनही मानवी मनाचे, समाजमनाचे यथार्थ दर्शन घडवते.

Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
last show of Vastra Haran in new set was held today in Thane
नव्या संचातील ‘वस्त्रहरण’चा शेवटचा प्रयोग आज ठाण्यात, नेत्यांनाही भुरळ
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन

लहानपणापासूनच कवितेत बोलण्याची विलक्षण प्रतिभा लाभलेल्या महादेवी वर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फरुखाबाद या गावी २६ मार्च १९०७ रोजी झाला. त्यांचे वडील गोविंद प्रसाद हे भागलपूरच्या डेली महाविद्यालयाचे प्राचार्य होते, तर आई हेमराणी धार्मिक वृत्तीच्या, संस्कृत, हिंदी भाषेच्या जाणकार विदुषी होत्या.  त्यांच्या आईमुळेच त्यांना काव्यलेखनाची प्रेरणा मिळाली.

हिंदी, संगीत, चित्रकला या विषयांचं त्यांचं शिक्षण सुरुवातीला घरी आणि नंतर इंदूरच्या मिशन स्कूलमध्ये झालं. पुढे प्रयाग विद्यापीठातून दर्शनशास्त्र (तत्त्वज्ञान) मध्ये त्यांनी बी.ए.ची परीक्षा दिली. प्रथमवर्गात त्या उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर १९३२ मध्ये प्रयाग विद्यापीठातूनच त्या संस्कृत विषय घेऊन एम.ए. झाल्या आणि लगेचच प्रयाग महिला विद्यापीठात प्राचार्या म्हणून नियुक्ती झाली. पुढे  त्या महिला विद्यापीठाच्या कुलगुरूही झाल्या.

म. गांधींच्या प्रभावामुळे त्यांनी जनसेवेचं व्रत स्वीकारलं. स्त्रियांसाठी शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी खूप कार्य केलं.  पुढे स्वत:च्या कमाईतून मिळालेला पैसा साहित्यिकांची दुरवस्था टाळण्यासाठी सुरू केलेल्या साहित्यकार संसदेच्या उभारणीच्या कामात घातला. १९५५ मध्ये साहित्यकार संसदेचं मुखपत्र असलेल्या ‘साहित्यकार’चेही संपादन केले. अशा प्रकारे त्यांचं समाजकार्य, देशकार्य सुरू होतं. तरीपण त्या कायम मनाने बांधल्या गेल्या त्या त्यांच्या कवितेशीच.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

चेंडूफेकीचा वेग

सध्या आयपीएलचा सीझन चालू आहे. अ‍ॅन्ड्रय़ू टाय किंवा आपलाच उमेश यादव यांच्यासारखे तेजतर्रार गोलंदाज भन्नाट वेगानं चेंडू टाकत असताना दिसतात. त्या समोरच्या फलंदाजांना ते चेंडू कदाचित नीट दिसत असतीलही; पण आपल्याला ते त्यानं टोलावल्यावरच दिसतात. तरीही त्यापूर्वीच त्या चेंडूचा वेग किती होता, हे पडद्यावर झळकतं. हे कसं काय जमवलं जातं बुवा? उडत्या पाखराची पिसं मोजण्याची कला त्यासाठी अवगत असावी लागते की काय! नाही. त्यासाठी पळणाऱ्या मोटारीचा वेग मोजण्यासाठी पोलीस ज्या स्पीड गनचा वापर करतात त्यातल्या तत्त्वाचाच अवलंब केला जातो.

स्टेशनवर आपण उभे असताना दुरून येणारी गाडी जसजशी जवळजवळ येते तसतशी त्याच्या शिटीच्या आवाजाची पट्टी उंचावत जाते. कारण त्या आवाजाच्या लहरी आपल्यापर्यंत पोचताना त्याचा उगम असणारी ती गाडी आपल्या दिशेनं ठरावीक वेगानं धावत असते. त्यामुळं त्या ध्वनिलहरी दाबल्या जातात. त्यांची वारंवारिता वाढते. यालाच डॉप्लर परिणाम म्हणतात. म्हणजे त्या ध्वनिलहरींच्या वारंवारितेवर त्या गाडीच्या वेगापायी बदल होत राहतो. तो मोजला की वेगही कळतो.

चेंडूफेकीसाठी याच तत्त्वाचा वापर करता येतो. त्यासाठी त्या चेंडूवर लेझर किरणांचा झोत टाकला जातो. लेझर किरण प्रकाशाच्या तुफानी वेगानं म्हणजेच एका सेकंदाला तीस लाख किलोमीटर या वेगानं धावत असतात. थोडक्यात एक अब्जांश सेकंदात ते तीस सेंटीमीटरची मजल मारू शकतात. ते किरण त्या चेंडूवर आपटून परत आपल्या दिशेनं येतात. त्यासाठी किती वेळ लागला हे मोजता येतं. त्यावरून तो चेंडू किती अंतरावर आहे, याचं गणित करता येतं. पण तो चेंडू स्थिर नसतो. तो वेगानं आपल्या दिशेनं येत असतो. म्हणूनच एका सेकंदात अशा किती तरी किरणलहरी त्या चेंडूकडे धाडल्या जातात. कमी कमी होणाऱ्या अंतरावरून त्या लहरी आपल्याकडे परतत असतात. त्या परतफेरीसाठी लागणारा वेळ बदलत राहतो. तो मोजून एका सेकंदात त्या चेंडूनं किती अंतर काटलं आहे हे मोजता येतं. तोच नाही का त्याचा वेग!

डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org