महादेवींच्या सशक्त काव्यलेखनाची आणि अनुभवसंपन्न वैचारिक गद्यलेखनाची दखल घेणारे अनेक सन्मान त्यांना मिळाले. भारत स्वतंत्र झाल्यावर १९५२ मध्ये त्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या नियुक्त सदस्या होत्या. १९५६ मध्ये ‘पद्मभूषण’ तर १९८८ मध्ये पद्मविभूषण किताबाने त्यांना गौरविण्यात आले. १९७९ मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप मिळविणाऱ्या महादेवी वर्मा या पहिल्या भारतीय महिला. विक्रम विश्वविद्यालय (१९६९) व बनारस हिन्दू विश्वविद्यालय ( १९८४) यांच्या तर्फे ‘डी.लिट.’ पदवी त्यांना देण्यात आली. ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार त्यांना १९८२ साली मिळाला, तर १६ डिसेंबर १९९१ रोजी भारत सरकारच्या टपाल खात्याने महादेवींच्या सन्मानार्थ दोन रुपयांचे टपाल तिकीट प्रसारित केले. त्याहीआधी १९३४ मध्ये ‘नीरजा’ काव्यसंग्रहासाठी सक्सेरिया पुरस्कार, ‘स्मृती की रेखाएँ’साठी द्विवेदी पदक (१९४२), मंगलाप्रसाद पुरस्कार (१९४३) असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.
महादेवींनी वेळोवेळी केलेल्या भाषणातून लेखातून आपले स्त्रीविषयी सामाजिक जाणिवेविषयी शैक्षणिक आणि साहित्याविषयीचे विचार स्पष्ट मांडले आहेत. जे साहित्य समाजाला व्यापून टाकते ते उत्तम साहित्य- हे त्यांचे आवडते मत होते.
महादेवींच्या मते मातृभाषा हेच शिक्षणाचे योग्य माध्यम आहे. भाषेचा संबंध मानवी मनाशी, अभिव्यक्तीशी अधिक असतो. प्रत्येक राष्ट्राला स्वत:ची स्वतंत्र भाषा असायला हवी. पण भारतातील नाही. याची त्यांना खंत होती. आपली शिक्षण पद्धती आमूलाग्र बदलली पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. माणसाला माणूसपण देण्याचे सामथ्र्य ज्या शिक्षण पद्धतीत नाही, अशीच शिक्षण पद्धती आपण आजही राबवतो आहोत. आजही केवळ प्रमाणपत्रे देणे हेच शिक्षण पद्धतीचे ध्येय आहे- याचे त्यांना दु:ख होते. जर नवी पिढी उत्तम निपजावी, सुसंस्कृत व्हावी अशी इच्छा असेल तर शिक्षण-साहित्याला आणि संस्कृतीला महत्त्वपूर्ण स्थान देणे आवश्यक आहे. असे झाले तरच विद्यार्थी खऱ्या अर्थाने ‘माणूस’ बनेल, असे स्पष्ट विचार- एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांनी मांडले आहेत.
चौफेर निरीक्षण, संतुलित दृष्टिकोन, प्रामाणिक, स्पष्ट विचारसरणी या वैशिष्टय़ांमुळे त्यांचे लेख, निबंध त्यातील विचार वाचनीय ठरले आहेत.
मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com
व्यवस्थापनशास्त्रातील मोजमापन
मोजमाप म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच लांबी, वजन, वेग अशी उदाहरणं येतील, तर काहींना १.५ हॉर्सपॉवरचा पंप, १ किलोवॉटची मोटर, १.६ लिटरचं इंजिन अशा गोष्टी आठवतील.
पण व्यवस्थापनशास्त्रात (Management) सहसा थेट मोजता येणार नाहीत, अशा अनेक राशी असतात. माणसांची गुणवत्ता, उत्पादन क्षमता, कार्यक्षमता, इ. त्या मोजण्यासाठी त्यांचं मोजण्यायोग्य अशा विविध परिमाणांमध्ये रूपांतर करून घेतलं जातं आणि त्यासाठी काही निकष, काही आडाखे, काही ठोकताळे वापरले जातात.
उदाहरणार्थ, माणसाची गुणवत्ता मोजायची असेल, तर तो माणूस कुठे काम करतो हे आधी बघावं लागतं. मग त्या कामासाठी आवश्यक कौशल्ये कोणती, त्यांचे घटक कोणते, त्यात किती प्रावीण्य लागेल यांची यादी केली जाते. त्यातल्या प्रत्येक घटकाला किती महत्त्व द्यायचं आणि तो कसा मोजायचा हे ठरवलं जातं. या अनेकमिती मोजमापनाला मेट्रिक्स (Metrics) म्हणतात.
कारखान्यात कारची जोडणी करताना यंत्र हाताळणी, अचूक नजर, सूचना समजून घेणे, काम वेळेत पार पाडणे, कामाची गुणवत्ता पारखणे, अशी कौशल्ये लागतील. तर तिथल्या व्यवस्थापकाला कामगारांच्या कामाची आखणी करणे, कामं योग्य वेळात योग्य त्या दर्जाची करून घेणे, सूचना सोप्या करून देता येणे, दोन-तीन भाषांमधून बोलता येणे, कामातल्या अडचणी समजून त्यावर उपाय शोधणे, ही कौशल्ये लागतील. अशी कौशल्ये ठरवणे आणि मोजणे खूप आव्हानात्मक असतं. म्हणूनच गेले शतकभर व्यवस्थापनशास्त्रातले अनेक तज्ज्ञ त्यावर संशोधन करत आहेत.
उत्पादन, विपणन (Marketing), वितरण, मानव संसाधन (Human Resources) अशा निरनिराळ्या विभागांना निरनिराळ्या प्रकारची मेट्रिक्स लागतात, तर इलेक्ट्रॉनिक उत्पादने, फार्मसी, रीटेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना पुन्हा वेगवेगळी मेट्रिक्स आवश्यक असतात. ही मेट्रिक्स आखताना त्या त्या क्षेत्रातील अनुभवांची नोंद आणि आकडेवारी कामी येतात. शिवाय विविध विज्ञानशाखा आणि समाजशास्त्रे (Humanities) यांच्यामधील संशोधनाची मदत घेतली जाते.
या आठवडय़ात आपण व्यवस्थापनशास्त्रातील अशीच काही आगळी मोजमापनं पाहणार आहोत.
– मेघश्री दळवी
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org