बडोदा नरेश सयाजीराव जटिल समस्यांमधून सहजतेने मार्ग काढण्यात माहीर होते. शहरातला ‘रावपुरा रोड’ हा वाहतुकीचा रस्ता अत्यंत अरुंद आहे आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या रस्त्याच्या रुंदीकरणाची योजना त्यांनी नक्की केली. हे काम सुरू करण्याआधी एक मोठा गुंतागुंतीचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. एका ठिकाणी रस्त्यामध्येच मौलानाबाबाची कबर होती. कबर रस्त्यातून काढून परस्पर दुसरीकडे हलविली तर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. हा संवेदनशील प्रश्न महाराजांनी मोठय़ा चतुराईने सोडविला. त्यांनी आपल्या ज्येष्ठ मुस्लीम अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडूनच ती कबर रस्त्याच्या कामाच्या जागेपासून १०० फुटांवरील मोकळ्या जागेवर रात्रीतूनच हलवून घेतली. त्या अधिकाऱ्यांनीच दुसऱ्या दिवशी सकाळी अफवा पसरविली की, रात्रीतून मौलानाबाबाची कबर आपोआप दुसरीकडे गेली, चमत्कार झाला!  दुसऱ्या दिवशी मोहोल्ल्यातल्या सर्व मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक महाराजांनी कबरीवर चादर चढवून तिथल्या व्यवस्थेसाठी देणगी दिली!
महाराजांच्या चातुर्याचा एक किस्सा बादशाह पंचम जॉर्जच्या बडोदा भेटीप्रसंगी घडलेला मनोरंजक आहे. पंचम जॉर्ज आणि महाराणी राजवाडा पाहत असताना दरबार हॉलच्या प्रवेशद्वाराच्या आतील सोन्याचे दोन सिंह पाहून थबकले! महाराणी मेरीची त्यावेळची लोभी नजर पाहून महाराज काय ते बरोबर उमजले. पंचम जॉर्जची बडोदाभेट संपल्यावर महाराजांनी त्वरित ते सोन्याचे सिंह वितळवून त्याचे सोने संस्थानाच्या खजिन्यात जमा केले. आठ दहा दिवसांनी महाराजांना व्हाइसरॉयचे पत्र आले की, ‘आपल्या दरबारातील सोन्याचे सिंह राणीसाहेबांना आवडले. त्यांच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये ठेवण्यासाठी ते आमच्याकडे त्वरित पाठवावे म्हणजे मग आम्ही ते लंडनला पाठवू.’ चतुर महाराजांनी कळविले की, ‘आíथक टंचाईमुळे आम्ही ते वितळवून टाकले आहे. राणीसाहेबांनी सिंहांबद्दल आधी कळविले असते तर आम्ही आनंदाने पाठविले असते!’
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल : पिंजण विभागातील यंत्रे- भाग ३
स्वयंचलित गाठ उकलक : मानवचलित गाठ उकलक यंत्राच्या अनेक मर्यादांमुळे स्वयंचलित गाठ उकलक विकसित करण्यात आले. स्वयंचलित गाठ उकलक यंत्राचे मूल तत्त्व म्हणजे या यंत्राच्या साहाय्याने गाठीतील कापूस उकलून तो पुढील यंत्राकडे पाठविला जातो. स्वयंचलित गाठ उकलक यंत्राच्या तीन पिढय़ा विकसित झाल्या. पहिल्या पिढीतील यंत्रांमध्ये उकलक यंत्र हे एका जागी स्थिर असे व गाठी मागे-पुढे किंवा चक्राकार मार्गात हलत असत. दुसऱ्या पिढीतील यंत्रांमध्ये गाठी जमिनीवर स्थिर ठेवलेल्या असतात आणि उकलक यंत्र हे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जात गाठीमधील कापूस उकलून घेते. या यंत्राचा मुख्य फायदा म्हणजे यामध्ये गाठींची संख्या मोठी असते. तिसऱ्या पिढीतील यंत्रामध्ये यंत्र व गाठी दोन्हीही चल असतात.
वर्तमानकाळात दुसऱ्या पिढीतील स्वयंचलित गाठ उकलक यंत्र हे सर्वात लोकप्रिय आहे. या यंत्रामध्ये गाठीमधील कापूस एक किंवा दोन दातेरी रुळांच्या साहाय्याने वर उचलला जातो. हे रूळ एका टॉवरमध्ये बसविलेले असतात. हा टॉवर रेल्वेच्या रुळासारखा रुळावरून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला फिरत असतो. या रुळांच्या दोन्ही बाजूला कापसाच्या गाठी ठेवलेल्या असतात. टॉवरमधील दातेरी रूळ गाठींवर टेकतात आणि कापूस खेचून घेतात. हा कापूस पुढे शोषपंपाच्या साहाय्याने खेचून घेऊन पुढील यंत्राकडे पाठविला जातो. गाठीतील कापूस जसजसा कमी होईल तसतसे गाठींची उंची कमी होऊ लागते. या वेळी टॉवरमधील दातेरी रूळ खाली करून ते कायमपणे गाठींवर टेकतील अशी योजना केलेली असते. त्यामुळे गाठीतील कापूस संपेपर्यंत कापूस व्यवस्थित खेचून घेतला जातो.
स्वयंचलित गाठ उकलक यंत्राचे मुख्य लाभ म्हणजे िपजण विभागाच्या सुरुवातीलाच गाठींची संख्या मोठी ठेवता येते. आधुनिक यंत्रात दोन्ही बाजूला मिळून १८० पर्यंत गाठी ठेवता येतात. गाठींची संख्या वाढल्यामुळे या सर्व गाठींतील कापसाच्या तंतूंचे उत्तम प्रकारे एकजिनसी मिश्रण करणे शक्य होते. याशिवाय गाठीतील कापूस हा यंत्राच्या साहाय्याने उचलला जात असल्यामुळे सुरुवातीला कापसाच्या पुंजक्याचे आकारमान अगदी लहान ठेवणे शक्य होते. या यंत्राने सुरुवातीला कापसाच्या पुंजक्याचे वजन ५ ते १० मि.ग्रॅम इतके कमी करता येते.
– चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ – office@mavipamumbai.org

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
white house
३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे