‘माल-एरिया’ म्हणजे खराब हवा. मलेरिया म्हणजे थंडी वाजून येणारा ताप. सुश्रुत संहितेत कीटकदंशाच्या तापाशी संबंध जोडलेला आहे. हिप्पोक्रेटसने साचलेले पाणी पिऊन ताप येतो आणि प्लीहा सुजते अशी नोंद केली आहे.

मलेरिया हा विषाणू-जिवाणूंपेक्षा मोठय़ा आणि गुंतागुंतीचे जीवन जगणाऱ्या, सूक्ष्म, दृश्यकेंद्रकी सूक्ष्मजीवांमुळे होतो. त्यांना ‘प्लास्मोडियम’ म्हणतात. या परजीवीच्या पाच जाती अस्तित्वात आहेत. त्यांना माणूस आणि डास अशा पोशिंद्यांच्या पेशींत शिरण्यायोग्य सुघटित, मुखांग असते. ‘प्लास्मोडियम’ला मानवी शरीरात प्रवेश करण्यासाठी डास या वाहक कीटकाची आवश्यकता असते. प्लास्मोडियमच्या पेशीभोवतालचे प्रथिनयुक्त आवरण वारंवार बदलते. त्यामुळे आपल्या संरक्षक पेशींना हा शत्रू आहे हे ओळखणेही कठीण जाते. रोग झाल्यावर उपचार करण्याऐवजी लस निर्माण करून मलेरिया होऊच नये असे प्रयत्न गेली २०-२५ वर्षे जगभर चालू आहेत. डासातून माणसात होऊ शकणारे प्लास्मोडियम संक्रमण रोखण्यासाठी म्हणजेच लाल रक्तपेशींतील प्लास्मोडियमची ‘स्पोरोझोइट’ ही अवस्था नष्ट करण्यासाठी आणि माणसाच्या रक्तातून डासाने शोषून घेतलेली ‘गॅमीटोसाइट्स’ ही अवस्था रोखण्यासाठी मलेरियाची लस तयार होत आहे.

yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mysterious flu like Disease X
आणखी एका महासाथीचा धोका? आतापर्यंत ७९ जणांचा मृत्यू; काय आहे ‘Disease X’?
Taddev, fish market toilet problem Taddev,
मुंबई : मोर्चाचा इशारा देताच पालिकेकडून तात्पुरत्या शौचालयाची उभारणी
Gang arrested for stealing mobile phones from shop in Lashkar area crime news Pune news
लष्कर भागातील दुकानातून मोबाइल चोरणारी टोळी गजाआड; दहा मोबाइल संच जप्त
30 bed updated ward at Thane District Hospital for treatment of Zika patients Mumbai print news
झिका रुग्णांच्या उपचरासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात ३० बेडचा अद्यावत कक्ष !
Opportunities in the field of radiation research at Mumbai University
मुंबई विद्यापीठात किरणोत्सर्ग संशोधन क्षेत्रात संधी!
mumbai municipal corporation demolishes womens toilet of fish vendor
मासळी विक्रेत्या महिल्यांच्या शौचालयावर पालिकेचा हातोडा

मॅन्युअल एल्किन मुरीलो या कोलंबियन शास्त्रज्ञाने प्लास्मोडियम फाल्सिपेरमच्या विरोधात पहिली लस तयार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

परजीवींमध्ये ६००० जनुके असतात. त्यांच्या जीवनचक्रात विविध टप्प्यांवर वेगवेगळी प्रथिने तयार होत असून हे परजीवी जटिल अशा त्रिमितीय प्रथिनांची निर्मिती करतात. जिवाणू आणि विषाणूच्या प्रथिनांपेक्षा पराजीवींची प्रथिने जटिल असल्यामुळे प्लास्मोडियमच्या विरोधात लस तयार करणे कठीण जाते.  आफ्रिकेत लहान मुलांना आरटीएस/एस (मॉसक्विरिस) ही लस दिली जाते. यात परजीवी प्लास्मोडियमला कमकुवत करून ही लस बनवलेली नसून ती प्रथिनांपासून बनवलेली असते. ती परजीवीला यकृतात शिरण्यास मज्जाव करते. आर २१/मॅट्रिक्स-एम या दुसऱ्या लशीची परिणामकारकता ७७ टक्के आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या लशीला मान्यता दिली आहे. या लशी माणसांत वापरण्यासाठी कितपत सुरक्षित आहेत याच्या चाचण्या होत आहेत. परजीवीतील ‘पीएफएस-२५’ या प्रथिनांची निर्मिती नियंत्रित करणारे डीएनएमधील जनुक  क्लमायडोमोनास नावाच्या हिरव्या शैवालात रोपित करून या प्रथिनाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करण्यात संशोधकांना यश प्राप्त झाले आहे. यापासून प्रथिनलस निर्मिती शक्य होणार आहे. या लशीची परिणामकारकता फक्त एक वर्षांची असते. या लशीचा दुष्परिणाम असा की, सात दिवसांत ताप येऊन फिट्स येतात, त्याला फेब्रिल सीझर्स असे म्हणतात.

– नारायण वाडदेकर  मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader