डॉ. निधी पटवर्धन

सध्या अनेक खेडय़ा-पाडय़ांतील वा नगरांतील तरुण मुलांनी नाटकच पाहिलेले नसते. ‘स्वगत’ आणि ‘नांदी’ म्हणजे काय, हे मराठी माध्यमात शिकलेल्या, १८ वर्षे वयाच्या ८० मुलांच्या वर्गात कोणालाही सांगता येत नाही, अशी अवस्था आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पाश्चात्त्य नाटय़शास्त्रातील संकल्पनांना मराठी पर्यायी शब्द कोणते सुचवता येतील ते पाहू या. ड्रामा म्हणजे नाटक, स्टेज म्हणजे रंगमंच, अ‍ॅक्ट म्हणजे अंक, सीन म्हणजे प्रवेश, अ‍ॅक्टर म्हणजे नट, अ‍ॅक्टिंग म्हणजे अभिनय, अ‍ॅक्टिंग स्टाईल म्हणजे अभिनय शैली, जेस्चर म्हणजे हावभाव, मेकअप म्हणजे रंगचर्या, लायटिंग म्हणजे प्रकाशयोजना, सिनोग्राफी म्हणजे नेपथ्य, सिनरी म्हणजे देखावा, डिझाइन कन्सेप्ट म्हणजे रचनेची संकल्पना, स्क्रिप्ट म्हणजे संहिता, प्लॉट म्हणजे कथानक, सबप्लॉट म्हणजे उपकथानक, कन्वेंशन म्हणजे नाटय़संकेत, फोर्थ वॉल म्हणजे चौथी भिंत, कर्टन म्हणजे पडदा, ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक, डिरेक्टर म्हणजे दिग्दर्शक, कास्टिंग म्हणजे पात्रयोजना, कॅरेक्टर म्हणजे व्यक्तिरेखा, हीरो म्हणजे नायक, कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष, कोरस म्हणजे वृंद, स्किट म्हणजे प्रहसन, क्लायमॅक्स म्हणजे उत्कर्ष बिंदू, थिएटर ऑफ क्रूअ‍ॅलिटी म्हणजे क्रौर्यनाटय़, एक्सपेरिमेंटल थिएटर म्हणजे प्रायोगिक रंगभूमी, थिएटर ऑफ अब्सर्ड म्हणजे असंगत नाटक, स्ट्रीट थिएटर म्हणजे पथ रंगमंच, डोमेस्टिक ड्रामा म्हणजे कौटुंबिक नाटक, मोनोलॉग म्हणजे एकोक्ती किंवा एकपात्री, द ग्रँड इल्युजन म्हणजे भव्य आभास, एपिलॉग म्हणजे भरतवाक्य, हमर्शिया म्हणजे शोकात्म प्रमाद.

अ‍ॅरिस्टॉटलच्या काव्यशास्त्रात शोकात्मिकेच्या व्याख्येमध्ये आलेली एक संज्ञा म्हणजे कॅथार्सिस. त्याचा अर्थ असा, की भावनांतील दु:खद किंवा त्रासदायक भाग काढून टाकणे. त्याला मराठीत ‘विरेचन’ म्हणतात. काही जणांना विरेचन शब्द बरा वाटत नाही, कारण ती वैद्यकीय क्षेत्रातील संकल्पना आहे. म्हणून ही संज्ञा टीकाकारांनी विशुद्धीकरण, सुवर्णमध्यीकरण, उदात्तीकरण, प्रायश्चित्तीकरण, समाधातीकरण, वज्रीकरण, सुस्पष्टीकरण अशा विविध शब्दकुळांशी सुद्धा जोडलेली आहे. अथेन्समधील नाटय़ोत्सवात तीन शोकांतिकांनी युक्त अशा प्रत्येक त्रिनाटय़ानंतर अर्धसुखान्त असे ‘सॅटीर नाटय़’ सादर केले जाई. या नाटय़ाला मराठी पर्यायी शब्द नाही, सांस्कृतिक संकल्पनेमुळे तो तयार करणेही कठीणच आहे!

nidheepatwardhan@gmail.com

Story img Loader