अमृता प्रीतम यांचे १५ कथासंग्रह प्रकाशित झाले असून त्यापैकी ‘कहानियों के आँगन में’ या १४ कथांच्या संग्रहाचा मराठी अनुवाद- ‘परिचय’ या नावाने माधवी देसाई यांनी केला आहे. यातील कथा म्हणजे लेखिकेला भेटलेल्या पात्रांच्या कहाण्या. दु:खभोग वाटय़ाला आलेल्या, अटळ नियतीच्या कथा स्त्रीजीवनाच्या कथा आहेत. नाइलाजाने कॉलगर्ल झालेली ती! आईवेगळ्या मुलीमध्ये पत्नीरूप पाहणारे, तिच्यावर जबरदस्ती करणारे, पश्चात्तापदग्ध वडील, आपल्यापासून पत्नीला मूल होणार नाही म्हणून मित्राला साकडे घालून वंशसातत्य राखू पाहणाऱ्या काशिनाथ आणि बलदेवची कथा, ‘अक्षरांच्या छायेत’ ही कथा तर अमृता आणि साहिरची प्रेमकथाच आहे. त्या संदर्भात अमृताजी लिहितात- ‘मी जेव्हा कहाणीत अमृताला, अमृता म्हणू शकले नाही, तेव्हा कधी अलका म्हटलं, कधी मिन्नू.. काहीही..’ नेपाळमधील कुमारिकेच्या पूजेचा एक जुना इतिहास सांगणारी, तत्कालीन प्रथेची, राजश्रीच्या जीवनाला कलाटणी देणारी, बळ देणारी दोन वर्षांनंतर (वितळणारी दरड) ही कथा तर मुळातूनच वाचायला हवी अशी आहे. मिन्नीच्या असफल प्रेमाच्या कथेत मिन्नी म्हणते, ‘एखादं नातं घातलेल्या कपडय़ासारखं असतं. केव्हाही काढून टाकता येतं. पण एखादं नात, नसातून वाहत्या रक्तासारखं असतं. त्याच्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही आणि एखादं अंगावर उठलेल्या खरजेसारखं असतं, नखांनी खरडून, खाजवून खाजवून ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर ते त्वचेत भिनतच जातं.’
‘रसीदी टिकट’ या अमृता प्रीतम यांच्या आत्मवृत्ताच्या प्रस्तावनेत त्या लिहितात सहज बोलता बोलता, खुशवंत सिंह मला म्हणाले, ‘तुझं आयुष्य तरी काय गं? एखादी लहानशी घटना. बस्स. लिहायचं म्हटलं तर साध्या पावतीच्या तिकिटामागे (र३ंेस्र्) लिहिली जाईल’ मग कविता, कादंबरीच्या कच्च्या जमाखर्चाची पावती पक्की करण्यासाठी त्यांनी ‘रसीदी टिकट’ लिहिलं आयुष्याच्या जमाखर्चाच्या कागदावर लावले जाणारे पावतीचे तिकीट म्हणजे हे एक प्रांजळ बिनधास्त निवेदन.
अमृता-इमरोजचं ४० वर्षांचं सहजीवन, प्रेम, मैत्री, समाजाची त्याविरुद्धची प्रखर प्रतिक्रिया; कुटुंबाच्या, मुलांच्या अपेक्षा, अमृताजींचं न लपवलेलं साहिरविषयीचे प्रेम- या सगळ्याची त्यांना मोजावी लागलेली किंमत आणि त्यातून केलेले लेखन आणि कितीही विरोध झाला तरी आपोआप चालून आलेले सन्मान हे सारंच विलक्षण आहे. अमृताजींच्या मनाच्या सत्याबरोबर जगण्याचं साहस म्हणजे काय हे ‘रसीदी टिकट’ वाचून समजतं.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com
मोजमापनाच्या प्रणाली
सुरुवातीला मानवी जीवनात लांबी, वस्तुमान आणि काळ या तीन राशी जास्त प्रमाणात व्यवहारात होत्या. या राशी मोजण्याचा संबंध सतत येत असे. या राशी स्वतंत्र असल्याने त्यांना मूलभूत राशी असे म्हणतात.
वेगवेगळ्या देशांत, शहरात, ग्रामीण भागात राशी मोजण्याची साधने आणि त्यांची एकके वेगवेगळी होती. उदाहरणच घ्यायचे झाले तर युरोपमध्ये लांबी मोजण्यासाठी इंच, मीटर, यार्ड, मल ही परिमाणे होती तर भारतात अंगुल, दंड, कोस, गज अशी परिमाणे होती.
जग जसजसे जवळ येत चालले, विज्ञानात जसजशी प्रगती होऊ लागली तसतशी भौतिक मापने वाढली. त्यामुळे परिमाणांचा एकमेकांशी असलेला संबंध अचूकपणे माहीत असणे अपरिहार्य झाले. शिवाय त्या मोजमापात अचूकता हवीच. अर्थातच मोजावयाच्या राशींच्या एककांत प्रमाणीकरण गरजेचे झाले.
शास्त्रीय उपयोगासाठी मूलभूत एककांपासून नवीन प्रणालींची परिमाणे तयार केली आहेत. यासाठी तीन प्रमुख पद्धती जगाने मान्य केलेल्या आहेत, त्या म्हणजे टङर, उॅर आणिोढर.
लांबी, वस्तुमान आणि काल या मूलभूत राशी मोजण्यासाठी कोणती एकके वापरली जातात, यावरून त्या प्रणालीची ओळख होते. लांबी, वस्तुमान आणि काल मोजायला अनुक्रमे सेंटिमीटर, ग्रॅम आणि सेकंद ही एकके वापरणाऱ्या प्रणालीला उॅर प्रणाली म्हणतात. तर टङर प्रणालीत लांबीसाठी मीटर, वस्तुमानासाठी किलोग्रॅम आणि काळासाठी सेकंद ही एकके वापरतात.
याशिवाय आणखी एक प्रणाली आहे. या प्रणालीला फूट-पाउंड-सेकंद म्हणजेचोढर प्रणाली म्हणतात.
या सर्व प्रणालींमध्ये एकवाक्यता येण्यासाठी १९६० साली ‘११व्या कॉन्फरन्स ऑफ वेट्स् अॅण्ड मेझर्स’मध्ये मेट्रिक पद्धतीचा (टङर) स्वीकार करावा, असे ठरले. या पद्धतीला आंतरराष्ट्रीय म्हणजे रक पद्धत असे म्हणतात.
System Internationale & Units या आंतरराष्ट्रीय एकक संस्थेच्या नावाचे संक्षिप्त रूप आहे. याच ‘११व्या कॉन्फरन्समध्ये मेट्रिक परिमाणातील सात मूलभूत राशींच्या एककांचीही निवड झाली. त्या सात मूलभूत राशी आणि त्यांची सात एकके खाली दिलेली आहेत.
(१) लांबी- मीटर, (२)वस्तुमान – किलोग्रॅम, (३) काल – सेकंद (४) तापमान – केल्व्हिन, (५)विद्युतप्रवाह -अॅम्पीअर , (६) दीप्ती-कॅण्डेला आणि (७) द्रव्य- लिटर
– डॉ. द. व्य. जहागीरदार
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org