१९६९ ते १९८३ या कालावधीतील भारतीय साहित्यातील सवरेत्कृष्ट योगदानासाठी १९८९चा ज्ञानपीठ पुरस्कार कुर्रतुलऐन हैदर यांना प्रदान करण्यात आला. कुर्रतुलऐन हैदर यांचा जन्म २० जानेवारी १९२७ रोजी उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील एका खानदानी, संपन्न  कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबात तीन पिढय़ांपासून लेखनाची परंपरा आहे. त्यांचे परिचित त्यांना ‘ऐनी आपा’ म्हणत असत. साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांचा मोलाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. ऐनी आपाचे वडील सज्जाद हैदर यलदरम हे उच्चशिक्षित विद्वान होते. उर्दूचे लोकप्रिय कथालेखक होते.  प्रागतिक, पुरोगामी विचारांच्या यलदरम यांनी सामाजिक, धार्मिक तसंच शैक्षणिक सुधारणांचाही पुरस्कार केला. ऐनी आपांच्या आईने- नजर सज्जद यांनी त्यांना पारंपरिक पद्धतीने कधीच वाढवलं नाही. अलिगढसारख्या सनातनी, परंपरानिष्ठ शहरातही त्यांच्या आईने बुरखा पद्धत झुगारून दिली होती. स्वदेशी आंदोलनातही त्या सहभागी झाल्या होत्या. उर्दूत कथा, कादंबरी लेखन करणाऱ्या त्या एक लोकप्रिय लेखिका होत्या.

वयाच्या ११व्या वर्षी त्यांनी पहिली कथा लिहिली. याशिवाय त्या हिंदुस्थानी संगीतही शिकल्या होत्या.  वयाच्या १४व्या वर्षी माध्यमिक परीक्षेत उर्दूत विशेष प्रावीण्य मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या. लखनौच्या कॉलेजमधून इंग्रजी विषयात पदवी आणि पुढे १९४७ मध्ये एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. आणि याच वर्षी त्यांचा पहिला कथासंग्रह ‘सितारों से आगे’ हा प्रकाशित झाला. एम.ए. झाल्यावर त्यांनी आर्ट्स स्कूलमधून कलेचे शिक्षण घेतले. त्यासंबंधात त्या लंडनला गेल्या. फाळणीनंतर त्यांनी काही काळ पाकिस्तान अ‍ॅडव्हर्टाईजिंग अ‍ॅण्ड पब्लिशिंग तसेच इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘डेली टेलिग्राफ’मध्ये बातमीदार म्हणून काम केलं. बी.बी.सी. लंडनमध्ये उर्दू विभागातही काम केलं. भारतात परत आल्यावर त्यांनी मुंबईत ‘इम्प्रिंट’मध्ये व्यवस्थापकीय संपादक म्हणून काम केलं. या काळातच कथा, कादंबरी, लघुकादंबरी, समीक्षा,  प्रवासवर्णन अशा सगळ्या प्रकारांत लेखन करून त्यांनी उर्दू साहित्यात आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे.

Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
saif ali khan amrita singh marriage story
सैफ अली खानने २१व्या वर्षी केले होते लग्न, आई-वडिलांनाही दिली नव्हती कल्पना; किस्सा सांगत म्हणालेला, “पहिलीच डेट आणि…”
radhika deshpande
“त्या व्यक्तीने मला…”, मराठी अभिनेत्रीबरोबर १६ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना; म्हणाली, “मी त्याच्या कानाखाली दिली”

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

आंबटचिंबट

‘कोल्ह्यला द्राक्षं आंबट’ असं आपण म्हणतो. पण कोल्ह्यालाच कशाला, आपल्यालाही न पिकलेली द्राक्षं आंबटच लागतील. आणि द्राक्षच कशाला कोणतंही न पिकलेलं फळ आंबटच लागतं. ते पिकल्यावरच त्यात गोडी उतरते. हा आंबटपणा या पदार्थामध्ये असलेल्या सायट्रिक, टार्टरिक वगरे सौम्य आम्लांचा प्रताप असतो.

िलब किंवा चिंच पिकल्यावरही आंबट लागतात. कारण िलबात सायट्रिक आणि चिंचेत टार्टरिक आम्लाचं प्रमाण जास्त असतं. थोडक्यात जेवढं आम्लाचं प्रमाण जास्त तेवढं ते खाद्य जास्त आंबट. म्हणूनच सौम्य हायड्रोक्लोरिक आम्लाच्या तुलनेत पदार्थाचा आंबटपणा मोजला जातो. या हायड्रोक्लोरिक आम्लाचा आंबटपणा एक असं मानलं तर टार्टरिक आम्लाचा आंबटपणा ०.७ आणि सायट्रिक आम्लाचा ०.४६ असतो.

तरीही आता प्रश्न उठेलच की, हायड्रोक्लोरिक आम्ल सौम्य म्हणजे नेमकं किती? त्याचं काही ठोस माप आहे की नाही? म्हणूनच त्यासाठी वेगळाच विचार करायला हवा.

साध्या पाण्यामध्ये काही रेणूंचं विभाजन हायड्रोजन आणि हायड्रोक्साइड अशा दोन आयनांमध्ये होतं. पाण्यामध्ये या दोघांचं प्रमाण समसमान असतं. म्हणूनच पाणी ना आम्ल ना अल्कली असं उदासीन असतं. परंतु काही आम्लं तिथं हजर असतील तर साहजिकच हायड्रोजन आयनांचं प्रमाण वाढतं. त्याचं मोजमाप करून पीएच म्हणजेच सामु हे एकक विकसित केलं गेलं आहे. उदासीन पाण्याचा सामु सात असतो. त्याहून तो कमी असेल तर त्या पदार्थाची गणना आम्लात होते. आणि तो सातापेक्षा जास्त असेल तर अल्कलीमध्ये.

आंबट पदार्थामध्ये सायट्रिक किंवा टार्टरिकसारख्या आम्लांच्या हजेरीमुळं त्यांचा सामु साताखाली उतरतो. तो जेवढा कमी तेवढा पदार्थ जास्त आंबट.

बहुतांश फळं जेव्हा पिकतात तेव्हा त्यातील पिष्टमय पदार्थाचं साखरेत रूपांतर होतं. साहजिकच त्यांच्यामधल्या आम्लांचं प्रमाण घसरतं, सामु साताकडे झुकतो. त्यांचा आंबटपणा कमी होतो. परंतु चिंच किंवा िलबू यांसारख्या फळांमध्ये साखरेचं प्रमाण फारसं वाढत नाही. त्यामुळं त्यांची चव आंबटगोड अशी राहिली तरी ती आंबटपणाला अधिक जवळ करणारी असते.

दुधात असलेले लॅक्टोबॅसिलस जातीचे जिवाणू त्यातल्या लॅक्टोज या साखरेचं लॅक्टिक आम्लात रूपांतर करतात. त्यामुळे दह्यामध्ये आंबटपणा उतरतो. जेव्हा या आम्लाचं प्रमाण कमी असतं तेव्हा दही गोडुसच लागतं. पण जसजसं हे प्रमाण वाढतं तसतसं ते अधिक आंबट लागतं.

डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org