नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये असे म्हणतात. कारण कालांतराने लाभलेल्या रूपाशी अगदी विसंगत असे ते असू शकते. शब्दांच्या बाबतीतही हे खरे आहे. पण आपली जिज्ञासा आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच व्युत्पत्तीशास्त्र विकसित झाले. भाषाशास्त्राचा एक भाग म्हणून ते महत्त्वाचे आहेच, पण आपली भाषा इतर भाषांच्या संपर्कातून कशी अधिकाधिक अर्थवाही आणि समृद्ध  होत गेली याचीही जाणीव शब्दांची व्युत्पत्ती शोधताना होत जाते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजकाल भाषा हे अस्मितेचे फार मोठे वाहक बनले आहे. मराठीपुरता विचार केला तर ‘‘मी मराठी’’चा गजर एक सामूहिक अस्मिता आणि अभिनिवेश नक्कीच निर्माण करतो. मग इंग्रजी पाटय़ांना काळे फासणे हा मराठीप्रेमाचा आविष्कार बनतो. हिंदूीभाषक रिक्षाचालकांना मराठीत बोलायची सक्ती केली जाते. तमिळभाषकांची ‘‘यंडू-गुंडू’’ अशी कुचेष्टा केली जाते. या  पार्श्वभूमीवर आपल्या भाषेतला एखादा शब्द मुळात आला कुठून याचा शोध या अभिनिवेशातील आक्रमकता कमी करतो. आपले अनेक शब्द इतर भाषांतून आले आहेत ही जाणीव इतर भाषांविषयी आदर वाढवते आणि आपल्या विविध भाषा हा आपला एक सामूहिक आणि काही प्रमाणात वैश्विकदेखील वारसा आहे याची जाणीव होते. अप्पा, अण्णा, अम्मा, ताई, अक्का ही आपलेपणा दाखवणारी संबोधने कन्नडमधून आपल्याकडे आली आहेत आणि ब्रेडसारखा इंग्लिश शब्द टाळून त्याला पाव म्हणण्यात आपले मराठीप्रेम सिद्ध होत नाही, कारण पाव हा शब्दही पोर्तुगीज भाषेतून आपल्याकडे आला आहे याची जाणीव आपल्या संकुचित विचारांना आळा  घालते. परस्परसंपर्कातून होणारी ही भाषिक देवाणघेवाण स्वाभाविक असते. एखादा शब्द कुठून आला याचा शोध कधीकधी इतिहास, भूगोल, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण, अर्थकारण अशा अनेक अनपेक्षित घटकांना स्पर्श करतो. त्यातून आपले स्वत:बद्दलचे आणि इतरांबद्दलचे आकलन अधिकाधिक विस्तारत जाते. आपल्या दैनंदिन वापरातील अनेक शब्दांचा रंजक शोध, शास्त्रीय अभ्यासात येऊ शकणारी क्लिष्टता टाळून, आपण आगामी लेखांतून घेणार आहोत.

भानू काळे bhanukale@gmail.com