यास्मिन शेख

इंग्लिश माध्यमातून शिकलेल्या, पण मराठी मातृभाषा असलेल्या व्यक्तींच्या बोलण्यात किंवा लेखनातही काही चुका होतात. इंग्लिश भाषेतील वाक्यरचनेच्या प्रभावाने अनेकदा मराठी वाक्यरचना सदोष होतात. अशा एका वाक्यरचनेचा परामर्श आज आपण घेणार आहोत. इंग्लिश भाषेत एखादी व्यक्ती काय बोलली, हे सांगताना किंवा लिहिताना त्या वाक्याची रचना मराठी वाक्यरचनेपेक्षा वेगळी होते. ते बोलणे जसेच्या तसे लिहिताना प्रत्यक्ष निवेदनपद्धतीचा वापर मराठीत आणि इंग्लिशमध्येही होतो. इंग्रजीत त्याला ‘Direct Narration’ म्हणतात. मराठीत आपण ‘प्रत्यक्ष निवेदनपद्धती’ म्हणतो. प्रत्यक्ष निवेदन करताना दोन्ही भाषांत अवतरणचिन्हे वापरतात. उदा.  He said, kkI want to visit my sick friend,  but I cant go.’’ या वाक्याचे मराठीत प्रत्यक्ष निवेदन असे होईल – तो म्हणाला  ‘‘माझ्या आजारी मित्राला मला भेटावंसं वाटतं, पण मला ते शक्य होणार नाही.’’ हे भाषांतर योग्य आहे. इंग्लिश व मराठी भाषांतरांत अवतरणचिन्हे वापरल्यामुळे तो जे बोलला ते शब्द जसेच्या तसे आले आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आता या वाक्याचे इंग्लिशमध्ये अप्रत्यक्ष निवेदन (Indirect Narration) असे होईल- ‘‘He said that he wanted to visit his friend,  but he could not go.’’ या वाक्यात अवतरणचिन्हे नाहीत आणि  said या भूतकाळी रूपाप्रमाणे त्या भाषणातही क्रियापदाची रूपे बदलली आहेत आणि  क च्या ऐवजी  he आलेले आहे. मात्र मराठीत अप्रत्यक्ष निवेदनपद्धती इंग्लिशच्या धर्तीवर नाही. मराठीत या वाक्याचे रूपांतर असे होईल. ‘तो म्हणाला, की मला माझ्या आजारी मित्राला भेटावेसे वाटते; पण ते मला शक्य होणार नाही.’ या वाक्याच्या स्वरूपावरून तुमच्या लक्षात येईल, या वाक्यात आपण ‘की’ या शब्दाची भर घातली आहे. अवतरणचिन्हेही वापरली नाहीत पण त्याचे बोलणे जसेच्या तसेच भाषांतरित केले आहे. (he च्या ऐवजी मी, वर्तमानकाळाऐवजी भूतकाळ) असा बदल (इंग्लिश वाक्यरचनेप्रमाणे) आपण करत नाही. याचा अर्थच असा, की इंग्लिश माध्यमाच्या व्यक्तींनी जर इंग्रजीच्या प्रभावाने अशी रचना केली, तर ती मराठीत मान्य होणार नाही. ती चुकीची रचना अशी- ‘तो म्हणाला की त्याच्या आजारी मित्राला त्याला भेटायचे होते, पण तो जाऊ शकला नाही.’ कृपा करून मराठीत अशी वाक्यरचना करू नये.

Story img Loader